agriculture news in Marathi good impact will be on agriculture of corona Maharashtra | Agrowon

कोरोनामुळे शेती व्यवसायावर सकारात्मक परिणाम होतील 

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

कोरोना महामारीमुळे इंग्लंडमधील शेती आणि पुरवठा साखळीवर सध्या विपरित परिणाम झालेला असला तरी दीर्घकालिन परिणाम पाहता इंग्लंमधील शेतीमध्ये सकारात्मक बदल होतील, असे मत एका ऑनलाईन सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले.

लंडनः कोरोना महामारीमुळे इंग्लंडमधील शेती आणि पुरवठा साखळीवर सध्या विपरित परिणाम झालेला असला तरी दीर्घकालिन परिणाम पाहता इंग्लंमधील शेतीमध्ये सकारात्मक बदल होतील, असे मत एका ऑनलाईन सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले. सॅविल्स रूरल रिसर्च या संस्थेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे शेतकरी सर्वेक्षण केले. 

या सर्वेक्षणात २९ टक्के शेतकऱ्यांनी कोरोनामुळे शेती मजुरांचे कामकाज विस्कळीत झाल्याचे सांगितले, तर ४३ टक्के शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजारपेठेत पोहोचविण्यात अडथळे आल्याचे सांगितले. कोरोना विषाणूमुळे इंग्लंमधील शेतीमध्ये सकारात्मक बदल होतील, असे मत ५९ टक्के शेतकऱ्यांनी व्यक्त केले. तर केवळ ५ टक्के शेतकऱ्यांना कोरोनामुळे देशातील शेतीवर वाईट परिणाम होणार असल्याचे वाटते. 

सध्या कोरोनामुळे उद्योग आणि पुरवठा साखळीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असले तरी या साथीमुळे देशांतर्गत अन्न सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. तसेच देशासाठी अन्न उत्पादनाचे अत्यावश्यक काम करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आहे. ब्रिटिश सरकारचा शेतीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर त्याचा दीर्घकालिन परिणाम होण्याची आशा बळावली आहे. इंग्लंड युरोपियन युनियनच्या सामाईक कृषी धोरणातून (कॉमन ॲग्रिकल्चर पॉलिसी-सीएपी) बाहेर पडल्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे शेतीची कामे, मजूर-कामगार, पुरवठा साखळी यांच्यावर विपरीत परिणाम झाल्याने शेती व्यवसायाला सर्वच आघाड्यांवर झगडावे लागत आहे. शेती उद्योगाच्या बाबतीत मोठी अनिश्चितता निर्माण झाल्याचे मानले जात आहे. परंतु शेतीविषयक दीर्घकालिन सकारात्मक भावनेने सध्याच्या नकारात्मक चित्रावर मात केल्याचे आढळून येत आहे. कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटिश सरकारच्या शेतीविषयक धोरणांमध्ये बदल होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...