विदर्भात सरासरी ५७ टक्के मतदान

मतदान
मतदान

नागपूर ः ईव्हीएम मशिनमध्ये ठिकठिकाणी झालेला तांत्रिक बिघाड, त्यामुळे मतदानप्रक्रिया बाधित होणे, गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रानजीक घडविलेला स्फोट तसेच मतदान करून परतणाऱ्या वाहनाला अपघात होत तिघे ठार, या घटनांचा अपवाद वगळता विदर्भातील सात मतदारसंघांत मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. कडाक्याच्या उन्हातही विदर्भात सरासरी ५५.९७ टक्के मतदान झाले आहे. पुढील तीन मतदार संघाकरिता १८ एप्रिलला मतदान होत आहे. गडकरी, गवळी, पटोलेंचे भाग्य मतपेटीत बंद भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, तसेच कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यात नागपूर मतदारसंघात थेट लढत आहे. यवतमाळ-वाशीममधील शिवसेनेच्या भावना गवळी, तर कॉंग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यात तुल्यबळ लढत आहे. वर्धा मतदारसंघात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस अणि भाजपचे रामदास तडस, रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि कॉंग्रेसचे किशोर गजभिये, गडचिरोली-चिमूरमध्ये अशोक नेते (भाजप) आणि नामदेव उसेंडी (कॉंग्रेस), भंडारा गोंदियात नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), तर सुनील मेंढे (भाजप) अशा लढती आहेत. यवतमाळ जिल्ह्यात इव्हीएममध्ये बिघाड भूगाव (नागपूर) येथे बॅटरी प्रॉब्लममुळे ४५ मिनिटे मतदानप्रक्रिया स्थगित झाली होती. यवतमाळसह सातही मतदारसंघांत इव्हीएममध्ये थोडे फार तांत्रिक बिघाड नोंदविण्यात आले. त्यामुळे मतदानप्रक्रिया सर्वदूर प्रभावित झाली होती. यवतमाळ येथील दाते कॉलेज मतदान केंद्रावर इव्हीएमच्या तांत्रिक  बिघाडामुळे पाऊण तास मतदानप्रक्रिया ठप्प झाली होती.  गडचिरोलीत स्फोट गडचिरोलीत मतदानाला गालबोट लागले.  कसनसून पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग घडवून आणला. यात कोणतेही नुकसान झाले नाही. नक्षलग्रस्त भागात चौकस सुरक्षा असतानाही नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. याच जिल्ह्यात मतदान करून परतताना ट्रॅक्‍टर-ट्रॉली उलटली. या घटनेत ३ ठार, तर ९ जखमी झाले. बहिष्काराचा परिणाम यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. नेर तालुक्‍यातील आजंती ग्रामस्थांचादेखील बहिष्कार असल्याने केवळ ३७ जणांनीच मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये दाभडी गावात चाय पे चर्चा केली होती. त्या वेळी स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीचे आश्‍वासन दिले होते. ते न पाळल्याचा विरोध म्हणून दाभडीवासीयांनी या वेळी बहिष्काराचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, ऐनवेळी बहिष्कार मागे घेत मतदान करण्यात आले.  निर्णय जनतेच्या न्यायायालयात- गडकरी विरोधी पक्षाला जे काही बोलायचे आहे, ते त्यांनी बोलावे, शेवटी जनतेच्या न्यायालयात निर्णय होतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मतदानानंतर दिली.  सात मतदार संघातील मतदान...

मतदार संघ   मतदान टक्के
वर्धा     ६५
यवतमाळ-वाशीम ५३.९७
चंद्रपूर     ५५.९५
भंडारा-गोंदिया  ६०.०५
गडचिरोली- चिमूर  ६०
रामटेक  ५१.७२
नागपूर    ६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com