गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे  नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित

अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. प्रकल्पाचे हे पाणी नदीकाठांवरील शेतात शिरून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याला आठ महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला असताना ही शेतकऱ्यांना मात्र भरपाई मिळाली नाही.
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे  नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित Of Gosikhurd dam water Deprived of damages
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे  नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित Of Gosikhurd dam water Deprived of damages

चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. प्रकल्पाचे हे पाणी नदीकाठांवरील शेतात शिरून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याला आठ महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला असताना ही शेतकऱ्यांना मात्र भरपाई मिळाली नसल्याने त्यांच्यामध्ये रोष व्यक्त होत आहे.

गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीकाठावरील अनेक गावे प्रभावित झाली. अनेक गावातील शेत जमीन खरडून गेल्याने वाळूचा थर पसरला. त्यामुळे ही जमीन काही वर्षासाठी नापीक झाली आहे. शेतकऱ्यांसमोर कोरोना संकटकाळात हे नवे संकट निर्माण झाले. शासनाने बाधित क्षेत्रात पंचनाम्याचे आदेश दिले. त्याआधारे काही गावातील नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देखील बाधितांच्या खात्यात जमा करण्यात आली. बरडकिन्ही गावातील अनेक शेतकऱ्यांना मात्र भरपाईसून डावलण्यात आले, असा आरोप आहे. 

बरडकिन्ही गावात शेती आणि घरांचे नुकसान झाले. या नुकसानीची कोणतीही दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली नाही. त्यामुळे हा बरडकिन्हीवासियांवर अन्याय असल्याने तो दूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा कृती संशोधन समितीतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी यशवंत खोब्रागडे भाऊराव मेश्राम आनंद रामटेके यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com