गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी आंतरराज्यासह समन्वय साधावा : जयंत पाटील

गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत आंतरराज्य यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा. त्यामुळे पूरनियंत्रणास मदत होईल, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी (ता. १४) दिले.
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी  आंतरराज्यासह समन्वय साधावा - जयंत पाटील Gosikhurd project for flood control Coordinate with inter-state - Jayant Patil
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी  आंतरराज्यासह समन्वय साधावा - जयंत पाटील Gosikhurd project for flood control Coordinate with inter-state - Jayant Patil

मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत आंतरराज्य यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा. त्यामुळे पूरनियंत्रणास मदत होईल, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी (ता. १४) दिले.  गतवर्षी आलेल्या गोसीखुर्द प्रकल्पातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी करण्यात येणाऱ्या पूरनियंत्रण कार्यक्रमाबाबतच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, खासदार प्रफुल पटेल, खासदार कृपाल तुमाने, खासदार सुनील मेंडे उपस्थित होते. आमदार नाना पटोले, ॲड. आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, राजू पारवे, ॲड. अभिजित वंजारी यांनीही संबंधित भागातील पुनर्वसन, नुकसान भरपाई, संभाव्य नियोजन, अडीअडचणी याबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या.  गतवर्षीसारखी पूरपरिस्थिती यावर्षी निर्माण होऊ नये याकरीता जलसंपदा विभाग तसेच महसूल यंत्रणेने समन्वय साधावा. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर असलेले पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न संबंधित जिल्हाधिकारी यांनी आमदार महोदयांशी चर्चा करुन ते सोडविण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. तसेच या बैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत २२ जून रोजी मुंबई येथे सविस्तर बैठक घेण्यात येईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 

पुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी ः विजय वडेट्टीवार  प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण शासन तयार करीत आहे. लवकरच ते पुर्ण होऊन त्याचा लाभ संबंधितांना होईल. गोसीखुर्द प्रकल्पातील असलेले पुनर्वसनाचे प्रश्न पुढील काही काळामध्ये मार्गी काढण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच विभागाने ११६ नवीन मोठ्या बोटी खरेदी करण्याचे ठरविले असून त्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यातून ४० बोटी विदर्भासाठी देण्यात येणार आहे. आपत्ती काळात प्रशिक्षित टीम तालुकास्तरावर ठेवण्याबाबतची सूचना चांगली असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. 

योग्य समन्वय आवश्यक ः एकनाथ शिंदे  सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महत्त्वाच्या सूचना केल्या. यात प्रामुख्याने मेडीगड प्रकल्प, संजय सरोवर तसेच तेलगंणा राज्याच्या धरणातील पाणी सोडताना व थांबविताना आपल्या राज्याच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. ज्यामुळे व्यवस्थित नियोजन करता येईल. गतवर्षीसारख्या अडचणी निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. 

लोकप्रतिनिधींच्या सूचना  खासदार प्रफुल पटेल यांनी भंडारा शहरासाठी असलेल्या पूरनियंत्रण भिंतीबाबतचे प्रश्न, तेथील पूनर्वसनाचे प्रश्न यात येणाऱ्या अडीअडचणी तातडीने सोडविण्याविषयी सूचना केली. याबाबतचे नियोजन करुन हे प्रश्न सोडविल्यास संभाव्य धोका टळू शकेल, असे स्पष्ट केले. खासदार कृपाल तूमाने, खासदार सुनील मेंढे यांनीही मागच्यावेळी झालेले नुकसान पाहता तत्काळ पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागावे, अशा सूचना केल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com