agriculture news in Marathi, got and sheep has scarcity of fodder and water, Maharashtra | Agrowon

सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात पावसाळ्यातही शेळ्या-मेंढ्या चारा-पाण्याच्या शोधात

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी असते. या ही वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. तलाव विहिरी कोरडे आहेत. पिण्याच्या पाण्याला तंकर सुरू आहेत तर जीत्राबाच्या चाऱ्यासाठी छावणी सुरू आहे. पण मेंढ्या, शेळ्यांसाठी शासनांनी चाऱ्याची कोणतीही सोय केली नाही.

सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी असते. या ही वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. तलाव विहिरी कोरडे आहेत. पिण्याच्या पाण्याला तंकर सुरू आहेत तर जीत्राबाच्या चाऱ्यासाठी छावणी सुरू आहे. पण मेंढ्या, शेळ्यांसाठी शासनांनी चाऱ्याची कोणतीही सोय केली नाही.

पावसाळा सुरू झाला की, मेंढपाळ पुन्हा आपल्या गावाकडं आली आहेत. पाऊस होईल या आशेने गावात आणि परिसरात मेंढ्या चाऱ्यासाठी फिरवल्या जात आहेत. परंतु, पाऊस झाला नसल्याने रानावनात गवत उगवले नाही. झाडा-झुडपांना पालवीही फुटली नाही. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या दिवसभर कुठे फिरवायच्या असा गंभीर प्रश्न पडला आहे. चारा काही वेळेस विकत घेता येईल पण जवळपास चाराच उपलब्ध होत नाही. रानात ओढ्या- नाल्याला पाण्याचा ठिपूस देखील नाही.

दुष्काळी भागातील मेंढ्यांचे कळप दिवाळीनंतर चाऱ्याच्या शोधात गाव सोडून इतर भागात जातात. त्या भागात उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते, पाऊस चांगला असतो. चाराही भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे मेंढ्याची उपासमार होत नाही. हिवाळा व उन्हाळा असे दोन्ही ऋतूतील सात ते आठ महिने तेथेच काढतात. पावसाळ्यात नदीकाठच्या गावांना पाऊस भरपूर असतो त्यामुळे मेंढ्याची निगा राखता येत नाही ,तर गावाकडे कमी जास्त पावसाने चारा उपलब्ध होत असतो.

म्हणून मेंढ्या घेऊन मेंढपाळ आपल्या गावाकडे येत असतो. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले असल्याने गावाकडे आलेल्या मेंढ्यांना चारा चं उपलब्ध होत नाही. मोकळ्या रानात शेळ्या-मेंढ्यां फिरवाव्या लागतात पण सध्या रानावनात पाऊस पडला नसल्याने चारा  उपलब्ध नाही त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांवर पुन्हा स्थलांतरांची वेळ आली आहे.


इतर बातम्या
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
सातारा जिल्ह्यातील ६३ हजारांवर...सातारा  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवादअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या...कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत...वाशीम  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने...
शेतकरी कर्जमुक्तीसाठी सोलापुरात आधार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
राज्य सरकारकडून २४ हजार कोटींच्या...मुंबई  : राज्य विधिमंडळाच्या...
खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य...सोलापूर  ः सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ....
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...