Agriculture news in marathi; Govardhan Govesh Seva Kendra will be implemented in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र राबविण्यात येणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 जून 2019

नाशिक  : नाशिक जिल्ह्यातील आठ महसुली उपविभागांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र राबविण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत गोशाळेसाठी नवीन मूलभूत सुविधा निर्माण करण्याकरता निवड झालेल्या गोशाळेसाठी सन २०१९-२० या आर्थिक व २५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान दोन टप्प्यांत देण्यात येईल. नाशिक जिल्ह्यातील ८ विभागांत हे केंद्र सुरू होणार आहेत. 

नाशिक  : नाशिक जिल्ह्यातील आठ महसुली उपविभागांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र राबविण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत गोशाळेसाठी नवीन मूलभूत सुविधा निर्माण करण्याकरता निवड झालेल्या गोशाळेसाठी सन २०१९-२० या आर्थिक व २५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान दोन टप्प्यांत देण्यात येईल. नाशिक जिल्ह्यातील ८ विभागांत हे केंद्र सुरू होणार आहेत. 

दुग्ध उत्पादनास, शेतीकामास, पशुपैदाशीत, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या व असलेल्या गाई, वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे अशा पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे, गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेले वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे, गोमूत्र, शेण इत्यादीपासून विविध उत्पादने, खते, गोबरगॅस व अन्य उपपदार्थांच्या निर्मितीस चालना देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. पशुपैदाशीच्या धोरणानुसार देशी जातीच्या गाईचे संवर्धन व त्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी संस्थेकडील देशी तसेच गावठी गायींमध्ये शुद्ध देशी गायीच्या जातीच्या वळूचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करून घेण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, नाशिक डॉ. गिरीश पाटील यांनी दिली. 

यासाठी ३ वर्षे पूर्ण असलेली गोशाळा, संस्थेची धर्मादाय आयुक्त व सहायक निबंधक यांच्याकडे नोंदणी बंधनकारक असून, तीन वर्षांचा संस्थेचा ताळेबंद यासह संस्थेने कर भरल्याचा तपशील; तसेच संस्थेच्या नावावर ५ एकर जमीन असल्याची माहिती अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी ३० जून २०१९ पर्यंत संबंधित तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, नाशिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ०४१८ व कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२५७९६०६ असा आहे.
 

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...