मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध :मुख्यमंत्री फडणवीस

मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध
मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध

नागपूर  : जगाच्या पाठीवर अतिशय प्राचीन भाषा म्हणून मराठीचा उल्लेख अभिमानाने करावा लागेल. मराठी भाषा ही अमृताचा ठेवा असून, त्यासाठी नागपूरचे बलिदान मोठे आहे. भाषेसाठी एवढे बलिदान दुसऱ्या कुठल्याही शहराने दिले नाही. त्यामुळे जागतिक मराठी साहित्य संमेलन नागपुरात होत असल्याचा आनंद आहे. एकविसाव्या शतकाच्या तत्त्वानुसार मराठीला विकसित करणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

१६ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने ‘शोध मराठी मनाचा’ या थीमवर हे संमेलन येथील वनामती सभागृहात रविवारपर्यंत (ता. ६) आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार, महापौर नंदा जिचकार, माजी खासदार अजय संचेती, दत्ता मेघे, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, यशवंतराव गडाख, गिरीश गांधी व शशिकांत चौधरी प्रमुख या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ``परदेशात मराठी माणसाने आपल्या कर्तृत्वावर विश्व उभे केले. यातून सामान्य मराठी तरुणाला प्रेरणा मिळत आहे. आपल्या आजूबाजूला प्रेरणा देणाऱ्या खूप व्यक्ती असतात. त्या व्यक्तींकडून तरुणाईने खूप काही शिकण्यासारखे आहे. चित्रपटसृष्टी मराठी माणसाने समृद्ध केली. मराठी नाटकाचे स्थान आजही अव्वल आहे. मराठी साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले.`` 

``मराठी भाषेची गोडी नवीन पिढीमध्ये निर्माण करण्याची गरज असून मराठी अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,`` असे गडकरी यांनी सांगितले. भाषेच्या विकासासाठी समाजाला किंवा सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा प्रत्येकाने आपली गुणवत्ता व क्षमता वाढविल्यास भाषेचा, पर्यायाने मराठी माणसाचा सन्मान वाढेल. मराठीचे योग्य सादरीकरण नव्या पिढीसमोर झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com