दुष्काळ निर्मूलनासाठी शासन कटिबद्ध : राज्यपाल

राज्यपाल हे पद घटनात्मक असताना त्यांनी ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे’ अशी भूमिका घेतली आहे. आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे? याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घालत आहोत. - धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद
राज्यपाल
राज्यपाल

मुंबई: अपुऱ्या पर्जन्यमानामुळे यंदा राज्यात दुष्काळी स्थिती आहे. या संकटावर मात करण्यासाठी दुष्काळ निवारणाच्या विविध उपाययोजनांद्वारे दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचे काम सुरू असून दुष्काळ निर्मूलनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची सुरवात राज्यपालांच्या अभिभाषणाने सोमवारी (ता.२५) झाली.  

दरम्यान, राज्यपालांच्या या अभिभाषणावेळी अनुपस्थित राहून विरोधीपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी बहिष्कार घातला. या वेळी राज्यपाल म्हणाले, गेल्या १७ वर्षांत यंदा राज्यात सर्वात कमी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे शासनाने, १५१ तालुक्यांमध्ये आणि २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. तसेच ५० महसुली मंडळांमधील आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य पुरविण्याबरोबरच शासनाने दुष्काळी उपाययोजना देखील योजले आहेत. चारा टंचाईची भीषणता लक्षात घेऊन शासनाने चारा लागवडीसाठी १०० टक्के अर्थसहाय्यावर शेतकऱ्यांना चारा बियाणे व खते पुरविण्यासाठी पुरेसा निधी मंजूर केला आहे.चारा छावण्या सुरू करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करीत आहे. वीजदेयके थकीत असल्यामुळे बंद पडलेल्या पेयजल योजनांची थकीत वीज देयकांची रक्कम भरुन या योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीतील पेयजल पुरवठा योजनांचे चालू वीज देयके भरण्याचा देखील निर्णय घेतला आहे. राज्यपाल म्हणाले....

  •  २,२२० कोटी रुपये खर्चाचा जागतिक बँक सहाय्यित ‘स्मार्ट’ सुरू
  •  दूध भुकटी निर्यातीठी ५० रुपये अनुदान
  •  दूध उत्पादकांना प्रति लिटर ५ रुपये अर्थसहाय्य 
  •  कर्र्जमाफी योजनेतून आतापर्यंत ४३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १८,०३६ कोटी जमा.
  • २०१७-१८ मध्ये ४०.१० लाख क्विंटल कडधान्ये, २.६२ लाख क्विंटल सोयाबीन आणि १९.४७ लाख क्विंटल हरभरा खरेदी केला
  •  हमीभाव खरेदीने ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ३,१२१ कोटी रुपये दिले. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान दिले.
  •  चार वर्षांमध्ये दीड लाखाहून अधिक सिंचन विहिरींचे बांधकाम 
  •  मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत १.३० लाखांहून अधिक शेततळी बांधली.  जलयुक्तमुळे मे २०१९ पर्यंत जवळपास २२,००० गावांना दुष्काळमुक्त करण्यास कटिबद्ध आहे.
  •  ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत’समाविष्ट केलेल्या २६ अपूर्ण सिंचन प्रकल्पांना गती. 
  •  बळिराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत १५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीतून पुढील ४ वर्षांत ९१ प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरविले आहे. 
  • विरोधकांचा बहिष्कार गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा हैं... आरएसएसचे समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार टाकतानाच सरकारविरोधात विधान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे आमदार उपस्थित होते. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com