आघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः बाळासाहेब थोरात

Government account allocation within two days : Balasaheb Thorat
Government account allocation within two days : Balasaheb Thorat

मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, अशी माहिती नवनियुक्त मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी दिली.

उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांचा शपथविधी २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर पार पडला. सरकार अस्तित्वात येऊन आठवडा उलटला तरी ठाकरे यांना नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करता आले नाही. खाते नसल्याने मंत्र्यांनाही काय काम करायचे? असा प्रश्न पडला आहे. यापार्श्वभूमीवर थोरात यांनी खातेवाटपाची चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असून याबाबत दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे सांगितले. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली आहे. आघाडीत शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद आले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र, काँग्रेसकडून मंत्र्यांची यादी निश्चित होत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार तसेच खातेवाटप वाटपाला विलंब होत आहे. 

दरम्यान, भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय केला आहे. भाजपमध्ये कर्तृत्ववान नेत्याला दूर लोटले जात आहे. भाजपने कारण नसताना एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित या नेत्यांची तिकीटे कापली, अशी टीकाही थोरात यांनी केली. भाजपमधील नाराज आमदार पुन्हा आघाडीत परतणार असल्याच्या चर्चेबद्दल बोलताना थोरात यांनी भरती जेवढी मोठी तेवढीच ओहोटीही मोठी असते, असा टोला भाजपला लगावला. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने या नेत्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र, अनेकांना पराभव पत्करावा लागला. भाजपची सत्ता गेल्याने हे नेते सध्या अस्वस्थ असल्याचेही थोरात म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com