‘अात्मदहन’ इशाऱ्यामुळे यंत्रणा हलली

‘अात्मदहन’ इशाऱ्यामुळे यंत्रणा हलली
‘अात्मदहन’ इशाऱ्यामुळे यंत्रणा हलली

अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बीजोत्पादन उत्पादन व वितरण अनुदानासाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर अात्महदहनाचा इशारा दिल्याने यंत्रणा अखेर हलली अाहे. शासनाच्या उपसचिवांनी या प्रकरणी कृषी अायुक्तांना संपूर्ण चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करावा, असे सुचविले अाहे. न्याय न मिळाल्यास अापण अापल्या निर्णयावर ठाम असल्याने या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बोलताना सांगितले.    सन २०१६-१७ मध्ये उत्पादित केलेल्या बियाण्यास उत्पादन व वितरणासाठीचे अनुदान शासनाकडून देण्यास नकार देण्यात अाला अाहे. मात्र, हे बीजोत्पादन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांनी कर्ज काढून पैसे उभे करीत गुंतवणूक केली होती. शासनाने एेनवेळी अनुदान न देण्याची भूमिका जाहीर केल्याने या शेतकरी कंपन्या अार्थिक अडचणीत सापडल्या. अनुदान मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शासनस्तरावर निवेदने देऊन पाठपुरावा केला जात होता. मात्र, तरीही काहीच निर्णय होत नसल्याने या शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी (ता.३१) कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव येथील निवासस्थानासमोर अात्मदहनाचा इशारा दिला. याची दखल घेत शासनाने बुलडाणा, वाशीमचे जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षकांना तातडीने पत्र देत या शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास सांगितले. तसेच, त्यांना अात्मदहनाच्या निर्णयापासून दूर करण्याचे सुचविले. सोबतच कृषी अायुक्तांनी याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे सुचविले अाहे. या अनुषंगाने बुधवारी (ता.२८) वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रतिनिधींना बोलवून चर्चा केली. त्यांनी अात्मदहनाचा इशारा मागे घ्यावा, असे सुचविले अाहे. मात्र, या प्रतिनिधींनी शेतकरी कंपन्यांची बाजू मांडत अनुदान मिळावे, अशी मागणी रेटून धरली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com