agriculture news in marathi, government bans 328 medicine | Agrowon

सरकारकडून 328 औषधांवर बंदी; पेनकिलर, अँटिबायोटिकचा समावेश
वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली ः आरोग्य मंत्रालयाने फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशनमध्ये (एफडीसी) येणाऱ्या 328 प्रकारच्या औषधांवर आज बंदी घातली असून, या औषधांचे उत्पादन आणि त्यांची विक्री तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या औषधांत पेनकिलर, कफ सिरप, विविध प्रकारचे मलम; तसेच अँटिबायोटिक गोळ्यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली ः आरोग्य मंत्रालयाने फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशनमध्ये (एफडीसी) येणाऱ्या 328 प्रकारच्या औषधांवर आज बंदी घातली असून, या औषधांचे उत्पादन आणि त्यांची विक्री तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या औषधांत पेनकिलर, कफ सिरप, विविध प्रकारचे मलम; तसेच अँटिबायोटिक गोळ्यांचा समावेश आहे.

मंत्रालयाने "एफडीसी'मध्ये मोडणाऱ्या अन्य सहा औषधांच्या उत्पादन व विक्रीला काही अटींसह प्रतिबंध केला आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये बहुतांशी औषधे अशी आहेत की, ज्यांसाठी डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शन गरज भासत नाही. त्यात डोकेदुखी, सर्दी, पोटदुखी अशा किरकोळ आजारांसाठी मिळणाऱ्या गोळ्या आणि सिरपचा समावेश आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने 2016 मध्ये अशा प्रकारच्या 350 औषधांवर बंदी घातली होती. त्याविरोधात विविध फार्मा कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

हे आहे कारण...
बंदी घातलेल्या 328 औषधांमध्ये वापरण्यात आलेल्या घटकांचा संबंधित आजारांशी थेट संबंध नसल्याचे सल्लागार मंडळाला (डीटीएबी) आढळले आहे. त्यामुळे ही औषधे मानवी आरोग्यास अपायकारक असून त्यावर बंदी घालण्याची शिफारस "डीटीएबी'ने केली होती. या कारणास्तव ही बंदी घातल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

एफडीसी म्हणजे?
दोन किंवा त्यापेक्षा अधिक औषधे एका समान प्रमाणात मिसळून त्यांचा एक सिंगल डोस तयार करणे, याला फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशन ड्रग म्हणजेच एफडीसी असे म्हणतात.

कही खुशी कही गम
हा निर्णय स्थानिक; तसेच विदेशी फार्मा कंपन्यांसाठी एक मोठा धक्का मानला जात असून, अँटिबायोटिक तसेच, इतर औषधांच्या गैरवापराला विरोध करणाऱ्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सहा हजार ब्रॅंड प्रभावित होणार
या बंदीचा फटका सुमारे 6 हजार ब्रॅंडला बसण्याचा अंदाज असून, यात सॅरिडॉन (पेनकिलर), स्कीन क्रिम (पॅन्डर्म), ग्लुकोनॉर्म पीजी (डायबिटीस) लुपिडिक्‍लॉक्‍स (अँटिबायोटिक); तसेच टॅक्‍झिम एझेड (ऍटिबॅक्‍टेरियल) अशा प्रसिद्ध औषधांचा यात समावेश आहे.
-----
या बंदीमुळे छोट्या-मोठ्या फार्मा कंपन्यांना दरवर्षी अंदाजे 1600 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्‍यता असून, या निर्णयाचे पालन केले जाईल.
- दीपनाथ रॉयचौधरी, "आयडीएमए'चे अध्यक्ष

इतर ताज्या घडामोडी
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...