सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला ः देवेंद्र फडणवीस

Government betrayed farmers : Devendra Fadnavis
Government betrayed farmers : Devendra Fadnavis

कोल्हापूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांची जी कर्जमाफी दिली ही उधारीची कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा काडीचाही उपयोग होणार नाही. एक नवा पैसा सरकारने दिलेला नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.  

सोमवारी (ता. २३) खासगी दौऱ्याच्या निमित्ताने श्री. फडणवीस कोल्हापुरात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष धनंजय महाडिक, हिंदुराव शेळके, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, प. महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव आदि या वेळी उपस्थित होते. 

श्री. फडणवीस म्हणाले, की नव्या सरकारचे पहिले अधिवेशन हे केवळ औपचारिक होते. सहा मंत्री. कोणतेही लक्षवेधी नाही अथवा कोणतेही प्रश्‍न नाहीत. जे प्रश्‍न विचारले गेले त्याला केवळ तीन मिनिटांत मंत्र्यांनी उत्तरे दिली. वेळ मारून नेण्याचे काम या सरकारने केले. राज्यात अवकाळी पावसामुळे ९४ लाख हेक्‍टरवरील पिके जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी २५ हजार रुपयांची मदत करू असे सांगितले होते. प्रत्यक्षात एक नव्या पैशाचीही मदत केली नाही. राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी हेक्टरी १८ हजार रुपये दिले. शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने सरसकट कर्जमाफीची गरज असताना प्रत्यक्ष त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. कर्जमाफीची नवी योजना ‘यू-टर्न’ देणारी आहे. 

सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी देणार अशी आश्‍वासने तिन्ही पक्षांनी जाहीरनाम्यात दिली होती. प्रत्यक्षात ती पाळली नाहीत. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यांत पुराच्या काळात आम्ही जी मदत केली त्यावेळी कोणतीही ‘कट ऑफ डेट’ आम्ही दिली नाही. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने अशीच भूमिका घ्यायला हवी होती. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. सरकारच्या विश्‍वाघाताविरोधात आम्ही रस्त्यावर  उतरणार आहोत त्याचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष निश्‍चित करतील, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी ही उधारीची कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांचा विश्‍वासघात सरकारने केला आहे.  - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com