Agriculture news in marathi Government buys additional milk Increase Limit: Ghatage | Agrowon

शासनाने अतिरिक्त दूध खरेदीची मर्यादा वाढवावी ः घाटगे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

कोल्हापूर : शासनाने अतिरिक्त दूध खरेदीची मर्यादा वाढवावी, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे व किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे यांनी केले. 

कोल्हापूर : शासनाने अतिरिक्त दूध खरेदीची मर्यादा वाढवावी, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे व किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे यांनी केले. 

निवेदनानुसार, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दररोज दहा लाख लिटर दूध प्रति लिटर २५ रूपये प्रमाणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तो स्वागताहार्य आहे. राज्यात गाय व म्हशीच्या दुधाच्या एकूण निर्मितीपैकी केवळ दहा लाख लिटर दूध खरेदी करणे हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकरी हिसासाठी अतिरिक्त दूध खरेदी करण्याची मर्यादा वाढवावी. 

पश्चिम महाराष्टात म्हशीचे दूध उत्पादन ८० टक्केच्या वर आहे. त्यामुळे दोन्ही दूध समान दराने खरेदी न करता म्हशीच्या दुधास जादा दर द्यावा. संचारबंदीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

फळ भाज्या, पालेभाज्या, शेतात पडून आहेत. शेतमालाला उठाव नाही. बऱ्याच तकऱ्यांची ऊस बिले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. दुधावरच त्याचे दैनंदिन अर्थकारण चालू आहे. त्यालाही दर नाही. त्यामुळे एकूण उत्पादनापैकी अतिरिक्त ठरणारे सर्व दूध खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी घाटगे, काटे यांची मागणी आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...