खानदेशात पावसाने कापूस खरेदी बंद; हजारो वाहने रांगेत उभी

जळगाव, कुऱ्हे (ता. भुसावळ), जामनेर, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर येथे कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने हजारो वाहने रांगेत उभी आहेत.
खानदेशात पावसाने कापूस खरेदी बंद; हजारो वाहने रांगेत उभी
खानदेशात पावसाने कापूस खरेदी बंद; हजारो वाहने रांगेत उभी

जळगाव : खानदेशात पावसाळी वातावरणाचा शासकीय कापूस खरेदीलाही फटका बसला आहे. कापूस महामंडळाच्या (सीसीआय) केंद्रात कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. जळगाव, कुऱ्हे (ता. भुसावळ), जामनेर, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर येथे कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने हजारो वाहने रांगेत उभी आहेत.  सीसीआयच्या खरेदी केंद्रांमध्ये कापूस पडून आहे. त्याची प्रक्रिया गतीने करून गाठी व सरकी सुरक्षित ठिकाणी साठवाव्या लागतील. अशा स्थितीत धावपळ आहे. नव्याने कापूस खरेदी करणे शक्य नाही. या सर्वच बाबी लक्षात घेऊन कापूस खरेदी बंद करण्यात आली. याबाबत सीसीआयच्या संबंधित केंद्रप्रमुखांनी बाजार समित्यांना तातडीने पत्र दिले आहे. खरेदी येत्या मंगळवारपर्यंत (ता. १५) बंद करण्यात आली आहे. परंतु वातावरण मंगळवारनंतरही प्रतिकूल, पावसाळी राहिले, तर खरेदी सुरू केली जाणार नाही.  खरेदी बंदचे आदेश देण्यापूर्वीच केंद्रात कापूस विक्रीसाठी ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अशातच खरेदी बंदचे आदेश जारी झाल्याने कापसाने भरलेली वाहने खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभी आहेत. खरेदी बंदचे आदेश मागे घेण्यासाठी कुऱ्हे (ता. भुसावळ) येथे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन गोंधळ घातला. शिंदखेडा येथेही शेतकऱ्यांनी सीसीआयच्या खरेदी बंदबाबत नाराजी व्यक्त केली आहे. परंतु सीसीआयने पावसाने कापसाचे नुकसान झाल्यास शासन व पर्यायाने लोकांचेच नुकसान होईल, असे म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com