Agriculture news in marathi Government committed to compensation: Sattar | Agrowon

नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध : सत्तार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची सर्व पिके , घरे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची सर्व पिके , घरे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. झालेल्या नुकसानीची भरपाई शासन लवकरच नियमाप्रमाणे देण्यासाठी कटिबद्ध आहे,’’ असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

वैजापूर येथील पंचायत समिती सभागृहात मंगळवारी (ता. २९) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम’ अंमलबजावणी आणि पावसामुळे झालेल्या शेतपिकांचे नुकसान, याबाबत आढावा बैठक झाली. त्यात सत्तार बोलत होते. खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रा. रमेश बोरणारे, उदयसिंह राजपूत,  जिल्हा परिषद आरोग्य सभापती अविनाश गलांडे,  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब शिंदे, तसिलदार निखील धूळधर आदींची उपस्थिती होती.

सत्तार म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम सर्वांनी प्रयत्नपूर्वक यशस्वी करावी. तालुक्यातील रुग्णांचा बरा होण्याचा दर ८९ टक्के आहे. तो अधिक वाढवून वैजापूर तालुका कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी कार्य करावे.’’ 

खासदार जलील यांनी वैजापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. अडचणी असतील त्या कळवाव्या, असे आवाहन यंत्रणेला केले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शेतपिकांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल लवकरच तयार करून शासनास सादर करण्यात येईल. उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे  सांगितले. तसेच मास्क वापरण्याबाबत सर्वांनी जागृती करण्याचे आवाहन केले. 
 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...