एकल महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध ः महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर

Government committed to the development of single women: Adv. Thakur
Government committed to the development of single women: Adv. Thakur

अकोला ः समाजातील विधवा व एकल महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. अशा एकल महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. 

जिल्हा परिषद कर्मचारी सभागृहात आयोजित शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसोबत संवाद साधण्यासाठी आयोजित संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषद सदस्या अर्चना राऊत, सेवानियुक्त उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर व इतर उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांशी संवाद साधताना ॲड. ठाकूर म्हणाल्या, आयुष्यात आलेले दु:ख धुणे धुण्यासारखे धुवून टाकावे, पिळून टाकावे. पुन्हा उमेदीने उभे राहावे. संकटाला सामोरे जावे. विचारांची व कार्याची भूक लागली पाहिजे. सर्व संकटे आत्मसन्मानाने दूर होतील. शासनाला आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर महिलांसाठी काय करता येईल, यासाठी संवाद साधून नियोजन करता येईल, असे ॲड. ठाकूर म्हणाल्या.

जामठी येथील पायल रडके या मुलीच्या आई व वडिलांनी आत्महत्या केली. त्यामुळे ती अनाथ झाली आहे. या दोन बहिणींच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेण्यात येणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्त कुंटुंबातील पायल रडके, शीतल पवार, शालू चव्हाण या महिलांनी मनोगत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक अमानकर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com