agriculture news in marathi, Government is committed for legal reservation says CM Fadnavis | Agrowon

कायदेशीर आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई : ''मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. सरकारने कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण द्यावे, असा निर्णय घेतला. तोडगा काढण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. यासंदर्भात मान्यवरांकडून अनेक सूचना आल्या. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे'', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) स्पष्ट केले. तसेच आंदोलकांनी आंदोलनादरम्यान हिंसा, आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

मुंबई : ''मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. सरकारने कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण द्यावे, असा निर्णय घेतला. तोडगा काढण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. यासंदर्भात मान्यवरांकडून अनेक सूचना आल्या. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे'', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) स्पष्ट केले. तसेच आंदोलकांनी आंदोलनादरम्यान हिंसा, आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी आज बैठक पार पडली. या बैठकीसाठी समाजातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ''राज्य सरकारने कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण द्यावे, असा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनादरम्यान जमावाने कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू नये. तसेच कोणीही आत्महत्या करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत मान्यवरांकडून सूचना करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यातील विविध भागात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जमावाकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी काहींनी आत्महत्याही केल्या होत्या. त्यानंतर आता या आरक्षणप्रश्नी आज बैठक घेण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...