दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध : देशमुख

दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध : देशमुख
दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध : देशमुख

सोलापूर : फळबाग जतन करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करा. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

सहकारमंत्र्यांनी उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्‍यांतील काही गावांतील दुष्काळ पाहणी केली. उत्तर सोलापुरातील हिरज, डोणगाव तर ‘दक्षिण’मधील कंदलगाव, येळेगाव, मंद्रूप, शिरवळ, बंकलगी या गावांचा दौरा सहकारमंत्र्यांनी केला.

दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दौऱ्यात त्यांनी अण्णाराव आंबले, सिद्धराम कुंभार, संतोष सुन्ने व इतर शेतकऱ्यांच्या शेतात पिकाची पाहणी केली. केळी, लिंबू बागांची सद्यःपरिस्थिती पाहून त्यावर उपाययोजनात्मक चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्यासाठीच दुष्काळ दौऱ्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार श्री. देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पिण्याच्या पाण्यासाठी वाडी वस्तीवर बोअर, टॅंकर आणि चारा छावणीची मागणी प्रामुख्याने केली. पाणंद योजनेतून रस्ते व्हावेत, वीजबिल माफ व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी सहकारमंत्र्यांकडे केली. बियाणे निम्म्या किमतीत मिळावे, दुष्काळ निधी, पीकविमा लवकर मिळावा, वडापूर बॅरेज बंधारा लवकर बांधून मिळाल्यास पाण्याचा प्रश्‍न सुटेल, रोजगार हमीची कामे चालू करावीत, कांदा अनुदान, पीकविमा अद्याप जमा झाला नसल्याची तक्रार काही गावातून आली. मंद्रूप ग्रामस्थांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. पाणी टॅंकर चालू करावेत, अशी मागणी केली. दुष्काळ निवारण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची हमी श्री. देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिली. 

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, दक्षिण सोलापूरच्या सभापती सोनाली कडते, उत्तरच्या सभापती संध्याराणी पवार, उपसभापती रजनी भडकुंबे, दक्षिणचे उपसभापती संदीप टेळे, बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील, श्रीमंत बंडगर, डोणगावचे सरपंच संजय भोसले, काशिनाथ कदम, हणमंत कुलकर्णी, यतीन शहा, गौरीशंकर मेंडगुदले उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com