कामगारांपर्यंत लाभ पोचविण्यासाठी शासन कटिबद्ध

कामगारांपर्यंत लाभ पोचविण्यासाठी शासन कटिबद्ध
कामगारांपर्यंत लाभ पोचविण्यासाठी शासन कटिबद्ध

बुलडाणा : केवळ शहरी भागापर्यंत ओळख असलेला कामगार विभाग आज ग्रामीण भागापर्यंत पोचला आहे. राज्यात कामगारांची नोंदणी लक्षणीयरित्या वाढली आहे. या विभागांतर्गत विविध कामगारांची ४९ मंडळे कार्यरत आहेत. या मंडळांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना अंमलात आहेत. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नोंदणीकृत कामगारांना देण्यात येत आहे. कुठलाही कामगार या याेजनांच्या लाभांपासून वंचित राहणार नाही. शेवटच्या कामगारापर्यंत लाभ पोचविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले.

जळगांव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणावर बांधकाम कामगारांना विविध लाभ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थित कामगार बंधूना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. 

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना येत्या ३ सप्टेंबरपासून सुरक्षा किटचे नगर पालिका ठिकाणी वाटप सुरू होणार असल्याचे सांगत डॉ. कुटे म्हणाले, बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी कसलेही पैसे देण्याची गरज नाही. तसेच योजनेच्या लाभासाठीसुद्धा पैसे देण्याची आवश्यकता नाही. यामध्ये कुणीही दलाल नाही. कुणी जर पैसे मागितले, तर त्याची रितसर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या २९ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. कामगारांच्या पाल्य इयत्ता १० वी हा ५० टक्केपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाल्यास १० हजार व ७५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळविल्यास २० हजार रुपये अर्थसाह्य पुढील शिक्षणासाठी देण्यात येत आहे.

तसेच कामगाराचा पाल्य हा वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला गेल्यास दरवर्षी १ लक्ष रुपयांचे शिष्यवृत्ती स्वरूपात अर्थसाह्य देण्यात येते. त्याचप्रमाणे मुलीच्या विवाहासाठी ५१ हजार रुपये, दुर्दैवाने नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसास २ लक्ष रुपये, २४ हजार रुपये प्रतिवर्षप्रमाणे ५ वर्षापर्यंत अर्थसाह्य देण्यात येते. बांधकाम कामगाराच्या घरकुलासाठी अटल बांधकाम कामगार घरकुल योजना कार्यान्वीत आहे. या योजनेंतर्गत पात्र कामगारांना पंतप्रधान आवास योजेनेच्या व्यतिरिक्त २ लक्ष रुपये अर्थसाह्य करण्यात येत आहे. कामगारांची नोंदणी सुरू राहणार असून वाटपही सुरू असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com