दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात मोकळ्या शेतात पंचनाम्यांचा फार्स
सातारा : अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पण, कोणत्याही शेतात सध्या खरिपाचे पीक अथवा काढणी झालेली पिके पाहायला मिळत नाहीत. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी पेरणीवर भर दिला आहे. आतातर विभागीय आयुक्तांनी जिओ टॅगिंग ॲपद्वारे नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली आहे. नुकसान दाखविण्यासाठी शेतात काहीही राहिलेले नसताना हा पंचनाम्यांचा फार्स कशासाठी, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे.

पावसाळ्यात अतिवृष्टी आणि त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरवातीला या नुकसानीचे पंचनामे करताना नैसर्गिक स्थितीमुळे अडचण निर्माण झाली होती. तरीही नजर अंदाजानुसार नुकसानीचे आकडे बांधण्यात आले. पावसाने मध्यंतरी दोन ते चार दिवस उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केली. तातडीने मिळेल, त्या भावाने त्याची विक्रीही केली. आता जिल्हा प्रशासन खरिपातील नुकसानीचे पंचनामे करू लागले आहे. ऊस, आले व हळद वगळता उर्वरित पिकांची शेतकऱ्यांनी असेल त्या अवस्थेत काढणी केली आहे. दिवाळीत सोयाबीन पिकाचा हमखास आधार शेतकऱ्यांना असतो. परंतु, या वेळी दिवाळीतच सोयाबीनची काढणी पूर्ण झाली. पण, असे काढणी झालेले पीक काळे पडले आहे. त्याला दरही फारसा मिळत नसल्याने घरी ठेवून पूर्ण नुकसान होण्यापेक्षा शेतकऱ्यांनी त्याची विक्री केली आहे.
ऊस, आले, हळद या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस मोठ्या प्रमाणात कोलमडला असून आले, हळदीवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. बागायती व पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरिपातील पिकांऐवजी आता बागायती क्षेत्रातील पिकांचेच प्रशासनाला पंचनामे करावे लागणार आहेत. पण, ज्या शेतकऱ्यांनी भिजलेल्या पिकांची काढणी करून मिळेल, त्या भावाने विक्री केली, अशा शेतकऱ्यांचे नुकसान कसे मोजली जाणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी
शेतात पिके नसल्याने आता शासनाने पंचनाम्याऐवजी सातबारावरील पिकांच्या नोंदीनुसार पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याबाबतचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- 1 of 1030
- ››