शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ः छगन भुजबळ

शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ः छगन भुजबळ
शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ः छगन भुजबळ

परभणी ः सर्वच शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झाला आहे. नापिकी, कर्जामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या भाजपचे सरकार थांबवू शकले नाही. शेतकरी, शेतमजुरांसह सर्व जनता महागाईने त्रस्त झाली आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

परभणी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शुक्रवारी (ता. २५) आयोजित समता मेळाव्यामध्ये श्री. भुजबळ बोलत होते. या वेळी माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुरार्णी, आमदार विजय भांबळे, आमदार रामराव वडकुते, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, तुकाराम रेंगे, सुरेश जाधव, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चक्रधर उगले, महिला आघाडीच्या मीनाताई राऊत, नानासाहेब राऊत, मुंजाभाऊ गायकवाड, रामेश्वर जावळे, एन. आय. काळे आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ पुढे म्हणाले, महात्मा जोतिराव फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा अासूड’ या ग्रंथामध्ये वर्णन केलेली शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती आजही कायम आहे. कोणत्याही शेतमालाला उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे सातत्याने नुकसान होत आहे. गतवर्षी खरेदी केलेल्या तूर, हरभरा खरेदीचे चुकारे अद्याप अदा केले जात नाहीत. दर कोसळून नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना कोणतीही ठोस मदत केली जात नाही. आता कुठे अनुदानासाठी अर्ज भरून घेतले जात आहेत. या सरकारच्या काळात सर्वच कृषी निविष्ठांचा खर्च वाढला. मात्र शेतमालाचे दर मात्र अत्यंत कमी राहिले. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्याकडे पैसे नसल्याचा परिणाम बाजारपेठेसह संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झाला आहे. या परिस्थितीत शेतीमध्ये काबाड कष्ट करणाऱ्या दिलासा देण्यासाठी दरमहा किमान पाच हजार रुपये मानधन सुरू करण्याची गरज आहे. महागाईमुळे सर्व जनता त्रस्त झाली आहे. भाजप सरकार आश्वासनाची पूर्ती करू शकले नाही, अशी टीका श्री. भुजबळ यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com