कारंजालाड, जि.
ताज्या घडामोडी
सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेवर नेतंय : पवार
नगर ः देशात एकीकडे बँकांना बुडवून पळणाऱ्या धनिकांची ७८ हजार कोटींची थकबाकी सरकार भरत आहे, तर दुसरीकडे कर्जमाफी तर सोडाच शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेवर हे सरकार नेत आहे. सरकारमधील कोणत्याही व्यक्तीला शेतकऱ्यांची आस्था नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी अशा लोकांना दारातच उभे करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी मंगळवारी (ता. ८) पारनेर येथे श्री. पवार यांची प्रचारसभा झाली. या वेळी माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख, कार्यकारी अध्यक्ष रविकांत वर्पे आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी श्री. पवार यांनी शासनाच्या शेतकरीविषयक भूमिकेवर कडाडून टीका केली. श्री. पवार म्हणाले, की शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले की या लोकांच्या पोटात दुखते. कांद्याला पैसे मिळू लागले की लगेच निर्यातबंदी करणे हे सरकारचे धोरण आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ ३१ टक्के शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. उर्वरित ६९ टक्के शेतकरी अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. महाराष्ट्रात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आम्ही सत्तेवर असताना सरसकट ७१ हजार कोटींची कर्जमाफी केल्याची आठवण श्री. पवार यांनी या वेळी करून दिली. आजची पिढी सकाळ-दुपार-संध्याकाळ पक्ष बदलत आहे. आपणास त्यामुळे फरक पडत नाही, असे सांगताना श्री. पवार यांनी नव्या पिढीबद्दल चिंता व्यक्त केली.
- 1 of 582
- ››