agriculture news in marathi, government give order of sao enquiry, pune, maharashtra | Agrowon

बीडच्या तत्कालीन ‘एसएओं’ची चौकशी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे  : कृषी विभागातील अधिकारी व कंत्राटदारांनी बीड जिल्ह्यात संगनमताने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्यामध्ये तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची (एसएओ) चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. 

पुणे  : कृषी विभागातील अधिकारी व कंत्राटदारांनी बीड जिल्ह्यात संगनमताने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्यामध्ये तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची (एसएओ) चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. 

जलयुक्त शिवार योजनेसाठी बीड जिल्ह्यात झालेल्या ३५ कोटी रुपयांच्या कामांमध्ये घोटाळा झालेला आहे. गेल्या तीन वर्षांपासून बीड भागात कार्यरत असलेल्या सोनेरी टोळीने हा घोटाळा केला आहे. कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापर्यंत मृदसंधारण व जलसंधारणाच्या कामाच्या तक्रारी गेल्यानंतर त्यांनी नियमानुसार सर्व चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीत अधिकारी आणि ठेकेदारांनी एकत्रितपणे चार कोटी रुपये हडप केल्याचे निष्पन्न झाले. चौकशी अहवालाची गंभीर दखल घेत फौजदारी कारवाईचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले होते.

जलयुक्त शिवार योजनेत डीबीटी नाही. त्यामुळे अधिकारी व ठेकेदार यांचे फावले आहे. त्यांनी एकत्र येऊन राज्यभर घोटाळे केले आहेत. पहिल्या टप्प्यात बीडमधील घोटाळा उघड झाला असून, १३८ ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात प्रकरणात आता तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने यांची चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्याच्या कृषी विभागाने कृषी आयुक्त श्री.सिंह यांना पाठविलेल्या पत्रात (क्रमांक प्र.क्र.१११-५ए) श्री. भताने यांच्यासह सर्व दोषींविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव तयार करून तत्काळ
राज्य शासनास सादर करा, असे आदेश दिले आहेत. राज्य नागरी सेवा (शिस्त व अपिल नियम १९७९) मधील नियम ८-१२ नुसार ही कारवाई करावी. राज्य शासनाने या प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

कृषी आयुक्तालयाने या कामांची सखोल तपासणी केली असता उपविभागीय कृषी अधिकारी एम. एन. पाळवदे, एच. बी. फड, एस. एस. हजारे, एस. एस. आव्हाड, डी. ए. काळदाते, व्ही. ए. भताने, यू. जी. भारती या अधिकाऱ्यांचा या घोटाळ्यात समावेश असल्याचे यापूर्वीच्या चौकशीत स्पष्ट झाले होते.

या घोटाळ्यात अनेक अधिकारी गुंतलेले असताना केवळ उपविभागीय कृषी अधिकारी एच. बी. फड यांचे निलंबन कसे झाले, असा सवाल कर्मचारी करीत आहेत. ‘एसएओं’च्या मार्गदर्शनाखाली हे घोटाळे होत असताना मोठे मासे सोडून इतर अधिका-यांना बळीचा बकरा बनविले जात असल्याचे काही क्षेत्रिय अधिका-यांचे म्हणणे आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कृषी आयुक्तालयातील काही घोटाळेबाज अधिकारी मोकाट फिरतात आणि सामान्य कर्मचा-यावर तत्काळ कारवाई होते, असाही युक्तिवाद कर्मचारी करतात.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...