agriculture news in Marathi government given check bounce due to balance Maharashtra | Agrowon

`बॅलन्स`अभावी शेतकऱ्याला दिलेला चेक झाला 'बाउन्स'

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्याला दिलेला १६ हजार रुपयांचा धनादेश शासनाच्या खात्यात पुरेसा पैसा नसल्याने बाऊन्स झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

अकोला ः अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्याला दिलेला १६ हजार रुपयांचा धनादेश शासनाच्या खात्यात पुरेसा पैसा नसल्याने बाऊन्स झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याला आता तरी त्याची रक्कम मिळेल का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

अकोला तालुक्यातील दहिगाव येथे एका शेतकऱ्याची पाच एकर शेती आहे. गेल्या वर्षात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. या शेतकऱ्याला १६ हजारांचा कॅनेरा बँकेचा धनादेश देण्यात आला होता. शेतकऱ्याने १६ मार्चला हा धनादेश स्वीकारत बँकेत वठवण्यासाठी टाकला.

परंतु, शासनाच्या संबंधित खात्यात पुरेसा निधी नसल्याने हा धनादेश बाऊन्स झाला. शेतकऱ्याच्या मुलाने जवळपास २५ दिवसांनी बँकेकडे विचारणा केली तर असता त्याला धनादेश बाऊन्स झाल्याचे बँकेने सांगितले. 

कोरोनामुळे तो बँकेत जाऊ शकला नव्हता. बँकेला संबंधित धनादेश परत मागितला तर सुरुवातीला तहसीलला पाठवला असल्याचे कळविण्यात आले. आता हा धनादेश तहसील कार्यालयाने परत बँकेकडे पाठवला आहे. बँकेने फोन करून चेक घेऊन जाण्याबाबत शेतकऱ्याला सांगितले. खात्यात पुरेसा निधी नसल्याबाबतचे पत्रही बँकेने दिले. हा धनादेश संबंधित शेतकऱ्याच्या मुलाने ताब्यात घेतला आहे. आता हा धनादेश तलाठ्याकडे द्या, असे त्याला सुचविण्यात आले. ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ या प्रत्यक्ष अनुभव हा शेतकरी पुत्र घेत आहे.

शासनाकडून शेतकऱ्यांना जी मदत दिल्या गेली त्यात जर अशा प्रकारचे चेक बाऊन्स झाले तर शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. पीकविमा व इतर मदतीमध्ये अशा अनेक चुका यापूर्वी उघड झालेल्या आहेत. चुकीचे परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागू नये यासाठी शासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.
- मनोज तायडे, शेतकरी जागर मंच, अकोला

 


इतर अॅग्रो विशेष
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
गुणवत्ता अन् विश्वासाचा ब्रॅण्ड ः...प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...