agriculture news in marathi, government gives extension for sugar export, kolhapur, maharashtra | Agrowon

साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पावसाळी स्थितीमुळे साखर निर्यातीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्याला यश मिळाले आहे. यामुळे निर्यातीस तयार असूनही बंदरापर्यत न पोचलेली साखर आता निर्यात होऊ शकेल. याचा फायदा साखर कारखान्यांना होऊ शकेल.
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली.

कोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर कारखानदारांना केंद्राने दोन महिने मुदतवाढ दिल्याने दिलासा मिळाला. २०१८-१९ ची साखर डिसेंबर अखेरपर्यंत निर्यात केल्यास त्याचा विचार अनुदानासाठी होणार असल्याने कारखान्यांनी निर्धारित कोट्यानुसार साखर निर्यात करावी, अशा सूचना सोमवारी (ता.११) केंद्रीय अन्न औषध विभागाचे सचिव जितेंद्र झुयल यांनी साखर कारखान्यांना दिल्या.

यापूर्वी ही मर्यादा सप्टेंबर अखेरपर्यंत होती. गेल्या वर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. याचा फटका यंदाच्या हंगामात कारखान्यांना बसू नये, यासाठी केंद्राने कारखान्यांनी साखर निर्यात करावी, याकरिता सप्टेंबरपर्यंतचा कालावधी दिला होता; परंतु महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत ऑगस्टपासून सलग दोन महिने सातत्याने पाऊस सुरू होता. महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात तर महापुराने कहर केल्याने पंधरा दिवसांहून अधिक काळ वाहतूक बंद झाली. रस्ते बंद असल्याने जे कारखाने साखर निर्यात करण्याच्या प्रक्रियेत होते. त्यांना याचा फटका बसला. यामुळे काही कारखान्यांची साखर मध्येच अडकली. बंदरावर परिस्थिती प्रतिकूल असल्याने रस्ते असूनही बंदरावर साखर पोच करता आली नाही. यामुळेच साखर निर्यातीत गेल्या दोन महिन्यांत मोठे अडथळे आले. निसर्गाचा फटका बसल्याने कारखान्यांची साखर निर्यात होऊ शकली नाही.

ही स्थिती पाहून राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने २०१८-१९ च्या साखर निर्यातीची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. अखेर त्याला यश येऊन सोमवारी याबाबतचे पत्र साखर कारखान्यांना शासनाच्या वतीने देण्यात आले. मुदत वाढविली असली तरी दिलेल्या कोट्याइतकीच साखर निर्यात करावी. २०१९-२० च्या निर्यात कोट्यात त्याचा समावेश असू नये, अशा सूचना कार्यालयाने केल्या आहेत. 
 


इतर अॅग्रो विशेष
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...