रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी : चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील
मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. यंदा राज्य शासनाने ३० हजार कोटींचा निधी केवळ रस्ते विकासासाठी उपलब्ध करून दिला आहे. राज्यात रस्ते विकासाचे जाळे निर्माण करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हातकणंगले तालुक्‍यातील आळते येथे ६ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा आणि नाबार्ड योजनेंतर्गत १ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या भीमनगर ते आळते ओढ्यावरील पूल बांधणी व रस्त्याच्या कामाचा प्रारंभ श्री. पाटील यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश हाळवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. सुजित मिणचेकर, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले आदी उपस्थित होते.

राज्याला गेल्यावर्षी रस्ते विकासासाठी १७ हजार कोटींची तरतूद होती. यामध्ये वाढ करून यंदा ३० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय केंद्र शासनाकडून १ लाख ६ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आणून त्यामधून गेल्या चार वर्षांत २२ हजार किलोमीटरचे सिमेंट क्राँक्रीटचे चार पदरी रस्ते करण्याचा क्रांतिकारी उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्यामुळे येत्या मार्चनंतर रस्त्यांची बहुतांशी कामे पूर्ण होतील, असा विश्वासही श्री. पाटील यांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com