agriculture news in marathi Government gram purchase Low response to online registration | Page 3 ||| Agrowon

शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला कमी प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये देशी हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली आहे.

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये देशी हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली आहे. यामुळे शासकीय खरेदीसंबंधी ऑनलाइन नोंदणीला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. 

ऑनलाइन नोंदणी गेल्या आठवड्यात सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यात दहा, धुळ्यात चार, नंदुरबारात चार खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. या १८ केंद्रांमध्ये फक्त ५०० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी हरभरा विक्रीसंबंधी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, पाचोरा, जळगाव, चोपडा, जामनेर, बोदवड, रावेर, यावल, मुक्ताईनगर, भडगाव येथे खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. जळगाव जिल्ह्यातही प्रतिसाद कमीच आहे. 

जळगाव जिल्ह्यात रब्बीमध्ये हरभऱ्याची पेरणी सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रात झाली आहे. हरभऱ्याचे दर सुरवातीला ४ हजार ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. त्यात या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुधारणा सुरू झाली. आवक वाढली, तशी दरात सुधारणादेखील दिसत आहे. दर हमीभावापर्यंत पोचल्याची स्थिती असल्याने शासकीय खरेदीसंबंधीच्या ऑनलाइन नोंदणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद आहे. 

जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर येथील बाजार हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. धुळ्यात शिरपूर व नंदुरबारात शहादा व तळोदा बाजारात हरभऱ्याची अधिकची आवक सुरू आहे. देशी, देशी सुधारित प्रकारच्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

चोपडा व अमळनेर येथील बाजारात गेल्या चार दिवसांत मिळून प्रतिदिन सरासरी तीन हजार क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. जळगाव येथील बाजारातही आवक वाढू लागली आहे. शिरपूर येथील बाजारातही प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विटल हरभऱ्याची आवक झाली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरी गुळाला ब्रॅंडिंगची संधीसोलापूर ः मधुरतेची वेगळी ओळख असलेला सोलापुरी...
उसाला पर्याय ठरण्याची उन्हाळी नाचणीत...कोल्हापूर : उन्हाळी नाचणी उसाचे कमी उत्पादन...
सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबत...सांगली ः टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन...
सौर प्रकल्पासाठी ८६ ग्रामपंचायतींचे...नागपूर : महा कृषी ऊर्जा धोरणांतर्गत शेतीला...
‘श्रद्धा’चा दूध व्यवसाय युवा पिढीला...नगर ः श्रद्धा नवीन पिढीला दूध व्यवसायात प्रेरणा...
कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला...नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
डाळिंबातील कीड- रोग नियंत्रणबहर व्यवस्थापन छाटणी मे महिन्यामध्ये केली असल्यास...
शेतकरी नियोजन पीक : शेवंतीमाझ्याकडे एकूण १० एकर शेती असून, पारंपरिक...
देवराई संवर्धनातून आदिवासींसाठी...मेघालयामध्ये देवराई संरक्षण आणि संवर्धनाला...
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...