सरकारने शेतकऱ्यांसाठी सप्तक्रांती केली ः केंद्रीय मंत्री जावडेकर

सरकारने शेतकऱ्यांसाठी सप्तक्रांती केली ः केंद्रीय मंत्री जावडेकर
सरकारने शेतकऱ्यांसाठी सप्तक्रांती केली ः केंद्रीय मंत्री जावडेकर

पुणे ः जोपर्यंत शेतकरी, शेतमजूर उभा राहत नाही, तोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्था मंद गतीने चालत असते. त्याला चालना देण्यासाठी या सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या विविध योजना आणून सप्तक्रांती केली आहे, असे प्रतिपादन मानव संसाधन विकास विभागाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.  

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या राज्यस्तरीय प्रारंभ कार्यक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी (ता. २४) आयोजित करण्यात आला होता. या वेळी कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, कृषी विभागाचे निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे, विस्तार संचालक विजय घावटे, मृद व जलसंधारण संचालक कैलास मोते, उपसंचालक अनिल बनसोडे, पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, पुणे विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी दादाराम सप्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. जे. पलघडमल आदी उपस्थित होते. 

श्री. जावडेकर म्हणाले की, ‘‘सरकारने कर्जमाफीची पुन्हा वेळ येणार नाही अशी वेळ आणली आहे. त्यासाठी या सरकारने पाणी, खते, शेतीमालाला दर देण्याचे ठरविले आहे. यासोबतच प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेऊन ते जमा केले जात आहे. येत्या ३० फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दोन हजार रुपये देण्यात येतील. त्यानंतर दोन टप्प्यात दोन दोन हजार रुपये जमा होतील.

पुणे जिल्ह्यातील १४ शेतकऱ्यांचा सत्कार  कार्यक्रम प्रसंगी मानव संसाधन विकास विभागाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात आलेले शेतकरी मारुती सणस (सणसनगर), गोविंद आव्हाळे (आव्हाळवाडी), सुदाम आव्हाळे (आव्हाळवाडी), उत्तम सातव (आव्हाळवाडी), गुलाब हरपळे (फुरसुंगी), गजानन यादव (फुरसुंगी), राजेंद्र वाळके (पेरणे), शिवाजी टुले (पेरणे), विठ्ठल गबदुले (किरकटवाडी), संजय करंजावणे (किरकटवाडी), शशिकांत हागवणे (किरकटवाडी), सुनील तागुंदे (खडकवाडी), दिलीप घुले (मांजरी बु), पवन घुले (मांजरी बु) यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com