शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता कुठे मातोश्रीवरून पुलावर आले आहेत. अजून ते शेतकऱ्यांच्या बांधावर यायचे आहेत. शेतकरी जगला काय? आणि मेला काय? याचं या सरकारला काही देण घेण नाही, यांना केवळ राजकारण करायचे आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
Government has nothing to do with farmers: Devendra Fadnavis
Government has nothing to do with farmers: Devendra Fadnavis

करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता कुठे मातोश्रीवरून पुलावर आले आहेत. अजून ते शेतकऱ्यांच्या बांधावर यायचे आहेत. शेतकरी जगला काय? आणि मेला काय? याचं या सरकारला काही देण घेण नाही, यांना केवळ राजकारण करायचे आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून टेंभुर्णी (ता. माढा) आणि कंदर (ता. करमाळा) येथील नुकसानीची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस यांनी करमाळा तालुक्‍यातील कंदर व शेलगांव, वांगी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, अजित तळेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, दीपक चव्हाण, अपर साळुंखे, ज्ञानेश पवार उपस्थित होते.

श्री. फडवणीस म्हणाले की, आघाडी सरकारचे नेते व मुख्यमंत्री अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या समस्या केंद्राच्या कानावर घातल्या पाहिजेत, आवश्‍यक ती केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्रात वजन असायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे, त्यांना निधी मागितला पाहिजे. नुकसान झालेल्या ऊस, केळीसह सर्व पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाला भाग पाडू. सरसकट पंचनामे झाले पाहिजेत. सरकारने नुसता देखावा न करता शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com