Agriculture news in marathi, Government help for entrepreneur loan waiver: Sharad Pawar | Agrowon

उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत : शरद पवार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत उद्योजकांनी ८१ हजार कोटीचे कर्ज थकविले. त्यामुळे बॅंकांची स्थिती बिकट झाली म्हणून सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडून घेऊन ते पैसे भरले; परंतु या सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत; पण आता कर्जमाफीचा दावा करतायेत, कुठे आहे आणि किती झाली आहे कर्जमाफी,’’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता.१५) अकलूज (ता. ळशिरस) येथे केला. 

अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत उद्योजकांनी ८१ हजार कोटीचे कर्ज थकविले. त्यामुळे बॅंकांची स्थिती बिकट झाली म्हणून सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडून घेऊन ते पैसे भरले; परंतु या सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत; पण आता कर्जमाफीचा दावा करतायेत, कुठे आहे आणि किती झाली आहे कर्जमाफी,’’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता.१५) अकलूज (ता. ळशिरस) येथे केला. 

अकलूज येथील श्रीराम मंदिर परिसरात माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. सुभाष पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, आमदार रामहरी रूपनवर, उमेदवार उत्तमराव जानकर, माढा मतदारसंघाचे उमेदवार बबनराव शिंदे उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्य सरकारच्या धोरणांमुळे तरुण बेरोजगार होत आहेत. या सरकारचे धोरण शेतकरी व कामगारांसाठी नसून मूठभर लोकांसाठी आहे. अशा लोकांच्या हातात पुन्हा सत्ता देऊ नका. मुख्यमंत्री कुस्तीसाठी पुढे पैलवान नसल्याची भाषा करतात; परंतु आपण कुस्ती परिषदेचे अध्यक्ष असून नवीन पैलवान तयार करीत असतो. शिवाय लढतीला पुढे कोण नाही, तर मग केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान व अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या राज्यात कशासाठी येतात.’’ 

‘‘गेली पाच वर्षे सत्तेत आहात. त्यात काय दिवे लावले ते सांगा. आम्ही अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. महिला आरक्षणाचा पहिला निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांचे दुखणे समजत नसलेले सरकार असून आतापर्यंत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे सरकार शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागून सत्तेवर आले. अरबी समुद्रात शिवस्मारक उभे करण्याची घोषणा केली. गेल्या चार वर्षांत एक वीटही तिथे बसवली नाही. उलट आमची अस्मिता असलेल्या किल्ल्यावर हॉटेलसह सर्व सुविधा अगदी छमछमचीही सुविधा देणार आहेत,’’ अशी टीकाही पवार यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
‘वसाका’ला उसाचे टिपरू तोडू देणार नाही,...नाशिक : ‘‘नाशिक जिल्ह्यातील कादवा व द्वारकाधीश या...
शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिलमाफी द्या, '...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
खेडीभोकरीला बोटीतून होतोय जीवघेणा...जळगाव : खेडीभोकरी (ता. चोपडा) ते भोकर (ता....
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या...मुंबई  :  मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना...
रत्नागिरीत २० हजार टन भात खरेदीचे...रत्नागिरी  : यंदा जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा...सांगली  ः राज्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन...
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अकोल्यात `...अकोला  ः जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांना...
...त्याने आपल्या शेतातील भाजी दिली थेट...पुणे : शिरूर तालुक्यातील केंदूर येथील सुनील...
रत्नागिरी जिल्ह्यात पिकांचे नुकसान आठ...रत्नागिरी : क्यार आणि महाचक्रीवादळामुळे जिल्ह्यात...
जळगाव : सोयाबीनची खरेदी शून्य; ज्वारी...जळगाव : जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय केंद्रातील...
नांदेड विभागात यंदा गाळपासाठी १६ साखर...नांदेड : यंदाच्या २०१९-२० च्या गाळप हंगामात...
सिद्धेश्वर धरणामध्ये ९२.५० टक्के...गोजेगाव, जि. हिंगोली : पूर्णा नदीवरील औंढा नागनाथ...
केंद्राचे पथक आज अकोला जिल्ह्यातअकोला : पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले...
नगर जिल्ह्यात गव्हात बियाणे बदलाचे...नगर : रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांत...
किमान तापमानात घट; विदर्भात थंडीत वाढमहाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढत आहे. या आठवडाच्या...
परभणीत वाटाण्याला ४००० ते ६००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...