agriculture news in marathi, government ignores to doing panchnama of pomegranate, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात नुकसानग्रस्त डाळिंब बागांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे ः जिल्ह्यातील बहुतांशी भागांत पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे, डाळिंब, सीताफळ या फळपिकांनाही पावसाने मोठा फटका बसला आहे. त्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी शासकीय अधिकारी व कर्मचारी डाळिंब बागांचे पंचनामे करण्यास टाळटाळ करत असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादन व संशोधन संघाचे विभागीय अध्यक्ष अतुल शिंगाडे यांनी दिली.

पुणे ः जिल्ह्यातील बहुतांशी भागांत पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे, डाळिंब, सीताफळ या फळपिकांनाही पावसाने मोठा फटका बसला आहे. त्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी शासकीय अधिकारी व कर्मचारी डाळिंब बागांचे पंचनामे करण्यास टाळटाळ करत असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादन व संशोधन संघाचे विभागीय अध्यक्ष अतुल शिंगाडे यांनी दिली.

गेल्या दहा ते बारा दिवस जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. यामुळे भात, बाजरी, सोयाबीन, भाजीपाला यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. प्रशासनानेही त्याची दखल घेत पंचनामे करण्यास सुरुवात केली. 

सोमवारी (ता. ४) पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरंदर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, हे आदेश तोंडी असून, लेखी आदेश असल्याशिवाय तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक हे डाळिंब पिकाचे पंचनामे करत नसल्याचे चित्र आहे. 

अतुल शिंगाडे म्हणाले, की माझ्याकडे जवळपास ६० ते ७० एकरांवर फळबाग आहे. यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र जवळपास ४० ते ५० एकर आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अति पावसामुळे डाळिंबाला काळे डाग पडले असून, मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात स्थानिक कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक, तालुका कृषी अधिकारी यांना माहिती दिली. परंतु, अधिकारी द्राक्षे, बाजरी, भाजीपाला पिकांचे पंचनामे करत असून डाळिंब पिकाचे पंचनामे करत नसल्याचे चित्र आहे. त्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, की लेखी आदेश नसल्याने आम्ही डाळिंबाचे पंचनामे करत नाही. परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकारी व मंत्र्यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले असून, पंचनामे करू, एवढेच ते सांगत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची पूर्व कल्पना दिली तरीही कोणाकडूनही प्रतिसाद मिळत नाही. सर्वच डाळिंब उत्पादकांची ही स्थिती आहे. त्यामुळे तातडीने नुकसानग्रस्त डाळिंबाचे पंचनामे करावेत, अशी आमची मागणी आहे.

इतर ताज्या घडामोडी
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...