Agriculture news in marathi, Government ignores inflation, unemployment : Shatrughan Sinha | Page 2 ||| Agrowon

महागाई, बेरोजगारीकडे सरकारचे दुर्लक्ष : शत्रुघ्न सिन्हा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

सोलापूर  : ‘‘महागाई, बेरोजगारी आणि भूकबळी यांसारखे अनेक मोठे प्रश्‍न देशासमोर असताना मोदी सरकारकडून जम्मू-काश्‍मीरमधून ३७० कलम हटविल्याचा डांगोरा पिटला जात आहे. त्याचे भांडवल केले जात आहे. मात्र, मतदारांमध्ये मोठी शक्ती असल्याने तेच परिवर्तन घडवू शकतात,’’ असा विश्‍वास कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला. 

सोलापूर  : ‘‘महागाई, बेरोजगारी आणि भूकबळी यांसारखे अनेक मोठे प्रश्‍न देशासमोर असताना मोदी सरकारकडून जम्मू-काश्‍मीरमधून ३७० कलम हटविल्याचा डांगोरा पिटला जात आहे. त्याचे भांडवल केले जात आहे. मात्र, मतदारांमध्ये मोठी शक्ती असल्याने तेच परिवर्तन घडवू शकतात,’’ असा विश्‍वास कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला. 

सोलापूर शहर मध्यमधील कॉँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे, दक्षिण सोलापूर मतदारसंघातील उमेदवार बाबा मिस्त्री व शहर उत्तरमधील मनोहर सपाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्‍वनाथ चाकोते, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर यू. एन. बेरिया, संजय हेमगड्डी, महापालिका गटनेते चेतन नरोटे उपस्थित होते.  

सिन्हा म्हणाले, ‘‘नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाला मोठा आर्थिक फटका बसला. सरकारला बेरोजगारीचा प्रश्‍न विचारला, तर सरकार ३७० कलम हटविण्याचे सांगते. नोटाबंदी आणि जीएसटीसारखा चुकीचा निर्णय सरकारने घेतल्याने आज देशातील उद्योगधंदे देशोधडीला लागले आहेत. महागाईने उच्चांक गाठला आहे. जीएसटीमुळे चार्टर्ड अकाउंटंटचा फायदा झाला आहे. भाजप सरकारकडून मोठमोठ्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी, भूकबळीमध्ये भारत जगात १०२ व्या स्थानी असल्याची आकडेवारी हंगर इंडेक्‍समधून नुकतीच समोर आली आहे.’’

‘‘पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा कोणीही मोठा नसतो. मात्र व्यक्तिगत अहंकारापोटी असे निर्णय घेतले जात आहेत.’’ असे सिन्हा यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...