खानदेशात शासकीय हरभरा खरेदीला वेग

जळगाव ः खानदेशात शासकीय हरभरा खरेदीला वेग येत आहे. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव व जळगाव येथील खरेदी केंद्र सुरू झाले. यानंतर इतर केंद्रेही या आठवड्यात सुरू झाली आहेत.
Government in Khandesh Accelerate the purchase of a gram
Government in Khandesh Accelerate the purchase of a gram

जळगाव  ः  खानदेशात शासकीय हरभरा खरेदीला वेग येत आहे. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव व जळगाव येथील खरेदी केंद्र सुरू झाले. यानंतर इतर केंद्रेही या आठवड्यात सुरू झाली  आहेत. 

शासकीय खरेदीला प्रतिसादही मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात  सुमारे सात खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. तर, धुळ्यात तीन, नंदुरबारात तीन खरेदी केंद्रे सुरू झाले आहेत. खानदेशात सुमारे आठ हजार शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती. नोंदणीला प्रतिसाद बऱ्यापैकी मिळाला आहे. परंतु खरेदी सुरू होण्यास विलंब होत होता. कोरोनाची वाढती समस्या व लोकप्रतिनिधी केंद्र उद्घाटनाला वेळ देत नसल्याने खरेदी सुरू होत नव्हती. तर काही केंद्रांमध्ये तांत्रिक अडचणी होत्या. ही समस्या दूर करून खरेदी केंद्र गेल्या आठवड्यात सुरू झाले. 

शासकीय खरेदी दर ५१०० रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. जळगाव, धरणगाव व इतर केंद्रांमध्येही खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. रोज अडीच हजार क्विंटलपर्यंतची खरेदी केली जात आहे. खरेदीला पुढे आणखी वेग येईल. खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश दिला जात आहे. हा संदेश प्राप्त झाल्यानंतर खरेदी केंद्रात हरभरा विक्रीसाठी आणण्याच्या सूचना आहेत. 

दरावरील दबाव दूर होण्यास मदत  

शासकीय खरेदी सुरू झाल्याने बाजारातही हरभरा दर टिकून आहेत. बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल किमान ४३०० व कमाल ४५०० रुपये दर आहे. मध्यंतरी दरावर दबाव वाढला होता. परंतु शासकीय खरेदी सुरू झाल्याने हा दबाव दूर होण्यास मदत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com