agriculture news in Marathi government likely to impose stock limit on tur and urad Maharashtra | Agrowon

कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा घालणार

कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात सध्या डाळींचे दर कमालीचे वाढले आहेत. परिणामी वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार तूर आणि उडीद पिकांच्या साठवणुकीवर मर्यादा घालण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात सध्या डाळींचे दर कमालीचे वाढले आहेत. परिणामी वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार तूर आणि उडीद पिकांच्या साठवणुकीवर मर्यादा घालण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

त्यातच खरिपात महत्त्वाच्या कडधान्य उत्पादक राज्यांमध्ये काढणीच्या वेळी अतिवृष्टी आणि पुरामुळे मूग, उडदाचे मोठे नुकसान झाले. तूर पिकालाही फटका बसला. त्यामुळे सध्या बाजारात आवक कमी झाल्याने डाळींचे दर वाढले आहेत. ‘‘वाढत्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी तूर आणि उडीद पिकावर साठा मर्यादा घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. साठा मर्यादा घातल्यास बाजारात पुरवठा वाढून दर नियंत्रण करता येतील. त्यामुळे हा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

सरकारने पहिल्या अंदाजात देशात २०१९-२० च्या हंगामात तूर उत्पादन ३५ लाख टन होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मागील वर्षी ३६ लाख टन तूर उत्पादन झाले होते. ‘‘तुरीचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत साठा मर्यादा घालून पुरवठा वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. एकदा नवीन पिकाची आवक सुरू झाल्यास दर आपोआप कमी होतील,’’ असेही सूत्रांनी सांगितले. 

अतिवृष्टीमुळे फटका   
कडधान्य उत्पादक मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः मूग आणि उडीद काढणीच्या काळातच पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाल्याने पीक हातचे गेले. उडीद पिकाला याचा मोठा फटका बसल्याने उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे बाजारात डाळीचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.  

आयातीचाही उपाय
बाजारातील डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कडधान्य आयातीलाही परवानगी दिली आहे. विशेषतः मूग आणि उडदाची आयात केली जाणार आहे. मूग आणि उडदाचा प्रत्येकी दीड लाख टन आयातीचा कोटा देण्यात आला आहे. तर तूर आयातीसाठी चार लाख टन आयात कोटा दिलेला आहे. या कोट्यातील कडधान्य आयातीचा कालावधी ३१ ऑक्टोबरएवजी १५ नोव्हेंबर करण्यात आला होता. परंतु, त्यात आता पुन्हा वाढ करण्याची शक्यता आहे.


इतर अॅग्रो विशेष
निर्यातवृद्धीचे शुभसंकेतपावसाळ्यानंतरही सातत्याचे ढगाळ हवामान आणि...
फळांचा राजा संकटाच्या फेऱ्यातमागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...
मोहाडीची मिरची निघाली दुबईलाभंडारा ः शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकारातून...
खाद्यतेल आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव...पुणे : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार खाद्यतेल...
‘माफसू’ला मिळाले `केव्हीके`नागपूर ः पशू व मत्स्य विज्ञानाचा प्रसार प्रचार...
गोंदिया, नागपूर, वर्धा येथे पावसाची...पुणे: राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे....
फेब्रुवारीअखेरपासून कर्जमाफीची रक्कम...पुणे : महात्मा फुले कर्जमाफी योजनेत दोन...
`व्हिएसआय`च्या ऊस प्रक्षेत्रांना दोन...पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय)...
सौर पंप तंत्राद्वारे फुलतेय तेवीस...डोर्ले (ता. जि. रत्नागिरी) येथील अजय तेंडूलकर...
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...