agriculture news in Marathi government make false promise of MSP Maharashtra | Agrowon

स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा केंद्राचा दावा फसवा : किसान सभा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च काढताना बियाणे, खते, कीटकनाशके यासह सर्व निविष्ठा (A२), कुटुंबाची मजुरी(FL) व व्याज, विमा हप्ता, जमिनीचे भाडे या सर्व बाबी एकत्र धरून सर्वंकष उत्पादन खर्च (C२) काढून यावर आधारित दीडपट भाव जाहीर करणे अपेक्षित होते.

नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च काढताना बियाणे, खते, कीटकनाशके यासह सर्व निविष्ठा (A२), कुटुंबाची मजुरी(FL) व व्याज, विमा हप्ता, जमिनीचे भाडे या सर्व बाबी एकत्र धरून सर्वंकष उत्पादन खर्च (C२) काढून यावर आधारित दीडपट भाव जाहीर करणे अपेक्षित होते. केंद्र सरकारने २०२०-२१चे भाव जाहीर करताना केवळ निविष्ठा व कुटुंबाची मजुरी धरूनच भाव जाहीर केले आहेत. सर्वंकष उत्पादन खर्च धरण्यात आलेला नाही. यामुळे जाहीर झालेले भाव स्वामीनाथन सुत्राप्रमाणे असल्याचा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलेला दावा दिशाभूल करणारा आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. 

कृषिमंत्र्यांनी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने १४ पिकांच्या आधारभावात भरीव वाढ केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात ही वाढ अनेक प्रमुख पिकांच्या संदर्भात मागील दोन वर्षांच्या वाढीच्या तुलनेत कमी आहे. भाताच्या आधारभावात मागील वर्षी ६५ रुपयांची वाढ केली होती. २०१८-१९ मध्ये यात २०० रुपयांची वाढ होती. या तुलनेत आता ५३ रुपयांची करण्यात आली. ज्वारीच्या आधारभावात मागील वर्षी १२० रुपये, तर २०१८-१९मध्ये ७३० रुपयांची वाढ होती. आता केवळ ७० रुपये वाढ आहे. इतर पिकांच्या बाबतीत वाढलेला उत्पादन खर्च पाहता वाढ तुटपुंजीच असल्याचे म्हटले आहे. 

लॉकडाऊनमूळे वितरण व्यवस्था कोलमडून पडल्यामुळे बियाणे, खते, औजारे, मजुरीसह सर्वच बाबींचे दर वाढल्यामुळे पिकांचा उत्पादन खर्च मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे. आधारभावात मात्र बहुतांश पिकांबाबत मागील वर्षीच्या वाढीच्या तुलनेत कमी वाढ करण्यात आल्याचे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले. 

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी पॅकेजची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी तेलबिया उत्पादकांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहणार असे सांगितले. खाद्यतेलाबाबतचे परावलंबित्व कमी करून आत्मनिर्भर होण्यासाठी तेलबिया उत्पादनाला चालना देण्याची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांच्या आधारभावात भरीव वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. प्रत्यक्षात मात्र यासाठी भरीव काहीच नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेऊन सर्व पिकांच्या आधारभावात वाढ करावी, रास्त उत्पादन खर्च काढून यानुसार दीडपट आधारभाव जाहीर करावा व यानुसार पुरेशी खरेदी यंत्रणा उभारावी अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी.गावीत यांच्यासह किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ.अजित नवले यांनी केली आहे. 
 


इतर बातम्या
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...