Agriculture news in marathi Government Medical College to be started in Nashik: Bhujbal | Agrowon

नाशिकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार : भुजबळ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नाशिक : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिक : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिक येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्याबाबतची बैठक मंत्रालयात झाली. त्या वेळी श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर तसेच वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी श्री. भुजबळ म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या धोरणानुसार नाशिक येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात सुरू करण्यात येईल.

त्याकरिता नाशिक येथील जिल्हा सामान्य रुग्णालय संलग्नित करणे आवश्यक असून वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात ३ वर्षांसाठी रुग्णालय हस्तांतरण करार करण्यात येईल. या शासकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर हे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू करण्यात येतील. यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी व फिजिओथेरेपी हे अभ्यासक्रम आरोग्य विद्यापीठामार्फत सुरू करण्यात येतील. शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार असल्याचेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.


इतर बातम्या
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
‘सेवा हमी'साठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसितसोलापूर : ‘‘सेवा हमी हक्क कायद्याची अंलबजावणी...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...