परभणीतील शासकीय दूध संकलन यंत्रणा तोकडी

परभणीतील शासकीय दूध संकलन यंत्रणा तोकडी
परभणीतील शासकीय दूध संकलन यंत्रणा तोकडी

परभणी ः सततचा दुष्काळ, नापिकीमुळे शेतकरी दूध व्यवसायाकडे वळत असल्यामुळे शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील शासकीय दुग्धशाळेतील दूध संकलनात महिन्यागणिक वाढ होत आहे; परंतु संकलन यंत्रणा तसेच दुग्धशाळेतील उपलब्ध प्रक्रिया यंत्रसामग्री तोकडी पडत आहे. अतिरिक्त ठरल्यामुळे दूध नाकारले जात आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गतवर्षीच्या (२०१७) सप्टेंबरच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात सुमारे तिपटीने वाढ झाली आहे.

यंदाच्या सप्टेंबर महिन्यात एकूण ११ लाख ७९ हजार २४ लिटर दूध संकलन झाले. सध्या शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्धशाळेतील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांतून प्रतिदिन सरासरी ३९ हजार लिटर दूध संकलन होत आहे. २०१७ च्या सप्टेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी १४ हजार ९७८ लिटर याप्रमाणे महिनाभरात एकूण ४ लाख ४९ हजार ३४० लिटर दूध संकलन झाले होते. या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी ३९ हजार ३०४ लिटर याप्रमाणे महिनाभरामध्ये ११ लाख ७९ हजार १२४ लिटर दूध संकलन झाले. गतवर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत दूध संकलन तिपटीने वाढल्यामुळे विविध ठिकाणची दूध शीतकरण केंद्र; तसेच मध्यवर्ती दुग्धशाळेतील यंत्रसामग्री अपुरी पडत आहे.

जिल्हा दूध विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत १२६ दूध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत आहेत. ६० ते ६५ दूध उत्पादक संस्थांची नोंदणी प्रलंबित आहे. दुग्धशाळेत प्रतिदिन २० हजार लिटर दुधाचे पाश्चेरायझेशन करणे शक्य आहे. काही वर्षांपूर्वी येथील दुग्धशाळेतील दूध संकलन २ हजार लिटरपर्यंत घसरले होते. त्यामुळे मनुष्यबळ कमी करण्यात आले होते.

परभणी शासकीय दुग्धशाळेतील सप्टेंबरमधील तुलनात्मक दूध संकलन स्थिती (लिटरमध्ये)
दूध शीतकरण केंद्र २०१७ २०१८ 
परभणी १,१९,३३७ ३,३०,८०७
पाथरी १,६८,६६४ ४,४७,३१३   
गंगाखेड ७०,५६८ १,६५,७४५
हिंगोली ५०,७७३ १,२१,५४८
नांदेड ३९,९९८ ९२,४९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com