संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले : चंद्रकांत पाटील

संत्रा पीक विम्याच्या हप्त्यात देखील जिल्हानिहाय वेगवेगळी रक्कम आकारून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
chandarkant_patil_1.jpg
chandarkant_patil_1.jpg

अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा पिकातील फळगळ बाबत राज्य सरकारने दुर्लक्षित धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असतानाच संत्रा पीक विम्याच्या हप्त्यात देखील जिल्हानिहाय वेगवेगळी रक्कम आकारून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.  दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मोर्शी येथे जयस्तंभ चौकात आयोजित कार्यकर्ता सभेत मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले. विदर्भातील संत्रा उत्पादक कधी कमी तर कधी जास्त पावसामुळे जेरीस आला आहे. अशावेळी अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले पाहिजे. मात्र या वर्षीच्या हंगामात संत्रा आणि मोसंबी पिकात फळगळ होत आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शन देखील करण्याबाबत सरकारने उदासीनता सिद्ध केली. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग तसेच केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थांचे प्रतिनिधीदेखील बांधावर पोहोचले नाही. संत्रा उत्पादकांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शनाच्या बाबतीत अपयशी ठरलेल्या सरकारने फळगळ झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली नाही. संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळपीक आहे. या बागायतदारांना अडचणीत शासनाने आधार दिला पाहिजे. मात्र शासन आधार देत नसेल तर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या विरोधात पेटून उठत आंदोलनाचा मार्ग अवलंबला पाहिजे. त्याकरिता सुरुवातीला तालुका, जिल्हास्तरावर आंदोलन करा. त्यानंतर देखील सरकार संत्रा उत्पादकांच्या पाठीशी उभे राहत नसेल तर मंत्रालय स्तरावर आंदोलन करून संत्रा उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधा, त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघारी फिरू नका, असे आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केले.  माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मनीष मेन, कमलसिंग चितोडिया, जयंत ढोले, देव बुरंगे यांची या वेळी उपस्थिती होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com