agriculture news in marathi government not taking steps for Orange Growers in Vidharbha says Chandrakant Patil | Page 3 ||| Agrowon

संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले : चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

संत्रा पीक विम्याच्या हप्त्यात देखील जिल्हानिहाय वेगवेगळी रक्कम आकारून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. 

अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा पिकातील फळगळ बाबत राज्य सरकारने दुर्लक्षित धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असतानाच संत्रा पीक विम्याच्या हप्त्यात देखील जिल्हानिहाय वेगवेगळी रक्कम आकारून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. 

दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मोर्शी येथे जयस्तंभ चौकात आयोजित कार्यकर्ता सभेत मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले. विदर्भातील संत्रा उत्पादक कधी कमी तर कधी जास्त पावसामुळे जेरीस आला आहे. अशावेळी अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले पाहिजे. मात्र या वर्षीच्या हंगामात संत्रा आणि मोसंबी पिकात फळगळ होत आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शन देखील करण्याबाबत सरकारने उदासीनता सिद्ध केली.

शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग तसेच केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थांचे प्रतिनिधीदेखील बांधावर पोहोचले नाही. संत्रा उत्पादकांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शनाच्या बाबतीत अपयशी ठरलेल्या सरकारने फळगळ झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली नाही. संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळपीक आहे. या बागायतदारांना अडचणीत शासनाने आधार दिला पाहिजे. मात्र शासन आधार देत नसेल तर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या विरोधात पेटून उठत आंदोलनाचा मार्ग अवलंबला पाहिजे. त्याकरिता सुरुवातीला तालुका, जिल्हास्तरावर आंदोलन करा. त्यानंतर देखील सरकार संत्रा उत्पादकांच्या पाठीशी उभे राहत नसेल तर मंत्रालय स्तरावर आंदोलन करून संत्रा उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधा, त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघारी फिरू नका, असे आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केले. 

माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मनीष मेन, कमलसिंग चितोडिया, जयंत ढोले, देव बुरंगे यांची या वेळी उपस्थिती होती. 


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...