दंड टाळण्यासाठी शेतकऱ्याला मागितली लाच

दंड टाळण्यासाठी शेतकऱ्याला मागितली लाच
दंड टाळण्यासाठी शेतकऱ्याला मागितली लाच

सोलापूर ः कॅनॉलचा मुरूम उचलून पाट फोडला व संपादित क्षेत्रात बोअर घेतले, याबाबत दंडात्मक कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महूद (ता. सांगोला) येथील पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता गणेश भिसे व चालक रमेश बुरजे यांना बुधवारी (ता. २७) वाकी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.  या प्रकरणातील तक्रारदार यांचे महूद-सांगोला रस्त्याकडेला वाकी हद्दीत शेतीत हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागून म्हसवड मध्यम प्रकल्पाचा कॅनॉल जात आहे. या कॅनॉलचा मुरूम उचलून पाट मोडला व संपादित क्षेत्रात कूपनलिका घेतल्याबाबत सहायक अभियंता म्हसवड तलाव शाखा महूद यांनी त्यांना नोटीस दिली होती. या नोटिसीप्रमाणे होणारी दंडात्मक कारवाई  टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या महूद शाखेचे सहायक अभियंता गणेश भिसे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली आहे, अशी तक्रार तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्याची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. त्यानुसार बुधवारी (ता. २७) तक्रारदार यांच्या हॉटेलवर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान सहायक अभियंता श्री. भिसे यांच्या समक्ष तक्रारदार यांच्याकडून चालक श्री. बुरजे यांनी लाचेच्या रकमेची मागणी करून लाचेची रक्कम पाच हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. यातील सहायक अभियंता गणेश तुकाराम भिसे (रा. कोरेगाव, ता. कर्जत, जि. नगर) व वाहनचालक रमेश बुरजे (रा. हरिओम रेसिडेन्सी, दूध डेअरीसमोर, पंढरपूर) यांच्याविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com