दुष्काळ निसर्गासह शासन धोरणनिर्मित आपत्ती ः शेट्टी

दुष्काळ निसर्गासह शासन धोरणनिर्मित आपत्ती ः शेट्टी
दुष्काळ निसर्गासह शासन धोरणनिर्मित आपत्ती ः शेट्टी

मानवत, जि. परभणी : दुष्काळ हा निसर्गासोबतच शासन धोरणनिर्मित आपत्ती आहे. या आपत्तीमुळे खचून जाऊ नये. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी (ता. १०) मानवत येथील संत सावता माळी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळ परिषदेत ते बोलत होते.

खासदार शेट्टी पुढे म्हणाले, की यंदा हवामान खात्याने १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु तसे घडले नाही. हवामान खात्याची अवस्थादेखील सतत खोटी आश्वासने देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी झाली आहे. पीकविमा योजना म्हणजे महसूल आणि कृषी विभागाच्या आशीर्वादाने टाकण्यात येणाऱ्या सरकारमान्य दरोड्याचे कायदेशीर साधन आहे.

शासनाचा केवळ दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यावर भर असून, प्रत्यक्ष उपाययोजना केल्या जात नाहीत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत, कर्जमाफी, वीजबिल माफी देण्यात यावी. चारा छावण्या उभारण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या दावणीला चारा पुरवावा. या परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मंत्र्यांना कपडे फाडून मारा विधानावर आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्येचा विचार करू नका एकजुटीने लढा द्या. शासकीय धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे कर्जमाफी म्हणजे उपकार नाहीत. याची जाणीव शासनाने ठेवावी. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव भाव या कायद्यासाठी संघर्ष करणार असल्याचे सांगितले.

या वेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रसिकाताई ढगे, युवती आघाडी अध्यक्षा पूजाताई मोरे, स्वाभिमानी संघटना जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, स्वाभिमानी पक्ष जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब आळणे पाटील, बाबासाहेब आवचार आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com