पूर्वहंगामी द्राक्षाला विमा देण्यासाठी शासन सकारात्मक

‘‘गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका द्राक्ष पिकाला बसत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या पूर्वहंगामी द्राक्ष पिकाला लवकरच विमा कवच देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे,’’ अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली.
Government positive to insure pre-season grapes
Government positive to insure pre-season grapes

सटाणा, जि. नाशिक : ‘‘गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका द्राक्ष पिकाला बसत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या पूर्वहंगामी द्राक्ष पिकाला लवकरच विमा कवच देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे,’’ अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली.

बागलाण तालुक्यातील खालचे टेंभे येथील सह्याद्री बागलाण विभाग शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बोरसे होते. कृषी सहसंचालक संजीव पडवळ, कृषी अधीक्षक एस. आर. वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी डी. जे. देवरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, द्राक्ष उत्पादक तुषार कापडणीस, अरुण वाघ, भाऊसाहेब अहिरे, देवेंद्र धोंडगे, प्रकाश तानाजी, जिभाऊ कापडणीस, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, अशोक पवार आदी उपस्थित होते.

धीरजकुमार म्हणाले, राज्यात आत्तापर्यंत तीन हजार शेती उत्पादक गटांची नोंदणी झाली आहे. गट स्थापन झाल्यामुळे त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून ३५ टक्के अनुदानावर प्रक्रिया उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध होईल. कोल्ड स्टोरेज, निर्यात केंद्र, खरेदी विक्री केंद्र सुद्धा उभारता येईल. त्यामुळे येणारा काळ हा शेती उत्पादक गटांसाठी नक्की चांगलाच राहील. शेतकऱ्यांनी त्यासाठी उत्पादक गटांची जास्तीत जास्त उभारणी करावी.

बोरसे म्हणाले की, पावसाळ्यात अनेक धोके पत्करून बागलाण, मालेगाव, कळवण, देवळा भागातील शेतकरी पूर्वहंगामी द्राक्ष पिकाचे उत्पादन घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकाला बसला. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यामुळे शासनाने या पिकाला विमा कवच द्यावे. शासनाने जुलै महिन्यापासून विमा लागू करावा.

अस्तरीकरणासाठी अनुदान योजना? आयुक्त धीरजकुमार यांनी प्लॅस्टिक अस्तरीकरणाचा पर्याय सांगितला. यासाठी शेतकऱ्यांची वेगवेगळी मते व अनुभव आहेत. म्हणून एक अभ्यास गट तयार केला जाईल. त्यानुसार अस्तरीकरणसाठी अनुदान योजना सुरू करण्याचे सूतोवाचही आयुक्त धीरजकुमार यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com