agriculture news in marathi, Government to provide safety kit tor farmers on Subsidy | Agrowon

शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा पुरवठा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात फवारणीदरम्यान विषबाधेच्या घटना घडल्या होत्या. त्यांची दखल घेत या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना ९० टक्‍के अनुदानावर सुरक्षा साहित्याचा (सेफ्टी किट) पुरवठा केला जात आहे. अनुदानाची रक्‍कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पांढरकवडा तालुका कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने यांनी केले आहे.

यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात फवारणीदरम्यान विषबाधेच्या घटना घडल्या होत्या. त्यांची दखल घेत या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना ९० टक्‍के अनुदानावर सुरक्षा साहित्याचा (सेफ्टी किट) पुरवठा केला जात आहे. अनुदानाची रक्‍कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पांढरकवडा तालुका कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने यांनी केले आहे.

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात बीटी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. या किडीच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांनी शिफारशीत नसणाऱ्या कीडनाशकांचे मिश्रण करून फवारणी केली. या वेळी सुरक्षा साधने वापरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना घडल्या. यामुळे हजारांवर शेतकरी, शेतमजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील १८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गेल्या वर्षभरापासून कृषी विभागाकडून सुरक्षीत फवारणी संदर्भाने व्यापक जागृती अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत ९० टक्‍के अनुदानावर सेफ्टी किटचा पुरवठादेखील करण्यात येत आहे. पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड, तालुका कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने यांनी सेफ्टी किट वापराबाबत जनजागृती अभियान राबविले. 

सेफ्टी किटसाठी लागणारे दस्तऐवज
कृषी सेवा केंद्रात आधार कार्ड तसेच पासबुकची झेरॉक्‍स अनुदानावरील सेफ्टी किट खरेदीसाठी द्यावी लागते. संबंधित दुकानदाराकडून बिल व शेतकऱ्यांचे दस्तऐवज सादर केल्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. संरक्षक किटची कमाल किंमत ३५० रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...