खानदेशात दीड लाख क्विंटल कापसाची शासकीय खरेदी

खानदेशात दीड लाख क्विंटल कापसाची शासकीय खरेदी
खानदेशात दीड लाख क्विंटल कापसाची शासकीय खरेदी

जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व पणन महासंघाची सर्व केंद्र सुरू असून, खरेदीला वेग आला आहे. मंगळवारपर्यंत (ता. २४) सुमारे दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी सर्व केंद्रांमध्ये झाल्याची माहिती आहे. 

सीसीआयचे जळगाव जिल्ह्यात जळगाव, चाळीसगाव, एरंडोल, पाचोरा, बोदवड, भुसावळ, जामनेरातील पहूर व शेंदूर्णी, चोपडा येथे खरेदी सुरू आहे. तर धुळ्यातील शिरपूर आणि नंदुरबारातही खरेदी सुरू आहे. पणन महासंघातर्फे जळगावमधील धरणगावात दोन केंद्रांमध्ये, पारोळा, भडगाव व धुळे येथे खरेदी सुरू आहे. 

सीसीआयतर्फे एक लाख क्विंटल तर पणन महासंघाने सुमारे ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. पणन महासंघाच्या केंद्रांमध्ये कापूस विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पणन महासंघाची केंद्र सीसीआयच्या केंद्रांनंतर सुरू झाली, परंतु पणनच्या केंद्रात कापूस खरेदी वेगाने झाल्याने सीसीआयच्या तुलनेत खरेदी अधिक झाली आहे. 

१२ टक्‍क्‍यांपर्यंतच्या आर्द्रतेचा कापूस अधिक येत असल्याने दर ५२५० रुपयांपर्यंत मिळत आहेत. दर्जेदार कापसाची आवक कमी प्रमाणात होत आहे. शासकीय खरेदी वेगात सुरू असल्याने खेडा खरेदीत कापसाचे दर ५००० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटलर्यंत पोचले आहेत. सरकीचे दर २४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वधारले आहेत. दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

सरकीचे सौदे गतीने करा  सीसीआयतर्फे सरकीचे सौदे करताना मुंबई येथील कार्यालयातून सूत्रे हलत आहेत. हे सौदे करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर किंवा संबंधित जिनींग कारखान्यातील अधिकारी व जिनींग कारखानदाराला दिले तर सीसीआयचा नफाही वाढेल व उलाढालीस चालना मिळेल. नुकसान टळेल, असे एका कारखानदाराने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com