सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत करण्याची मागणी

अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकरी संकटात आलेला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने केली आहे. सोमवारी (ता. ६) या समितीची बैठक झाली. यात याबाबत ठराव घेत तो शासनाकडे पाठविण्याचे ठरविण्यात आले.
Government seeks help in soybean seed case

स्थायी समितीच्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने, उपाध्यक्षा सावित्री राठोड, सभापती चंद्रशेखर पांडे, मनीषा बोर्डे, आकाश शिरसाट, पंजाबराव वंडाळ, ज्ञानेश्वर सुलताने, गजानन पुंडकर, गोपाल दातकर आदी उपस्थित होते.

सोयाबीन बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे आदेश शासनाने ‘महाबीज’ला दिले आहेत; परंतु खासगी कंपन्यांबाबत अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. यामुळे बियाणे उगवले नसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाईची मदत देण्यात यावी, असा ठराव शिवसेनेचे गटनेते गोपाल दातकर यांनी मांडला. हा ठराव समितीने मंजूर केला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याबाबत एकमताने ठरविण्यात आले.

‘महाबीज’ व खासगी बियाणे कंपन्यांचे बियाणे उगवले नसलेल्या शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. याबाबत कृषी विभागाने काय कार्यवाही केली, याची माहिती सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी विचारली. यावर कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी जिल्हा परिषद कृषी विभागाने सोयाबीन बियाण्यांचे नमुने घेतले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com