सरकारने नाकर्तेपणा दाखवू नये : दरकेर

सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत देणार नाही, असं म्हणतंय, पण केंद्राची मदत तातडीने द्या म्हणतं, हे चाललंय काय, आपला नाकर्तेपणा दुसऱ्यावर का ढकलता, आधी शेतकऱ्यांना मदत द्या.``
Government should not show negativity: Darker
Government should not show negativity: Darker

सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत देणार नाही, असं म्हणतंय, पण केंद्राची मदत तातडीने द्या म्हणतं, हे चाललंय काय, आपला नाकर्तेपणा दुसऱ्यावर का ढकलता, आधी शेतकऱ्यांना मदत द्या, अद्याप दहा टक्केही पंचनामे झाले नाहीत, मदत कसली आणि कधी देणार, असा प्रहार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (ता. २०) येथे पत्रकारांशी बोलताना केला.

श्री. दरेकर यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर सोलापुरात त्यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. 

श्री. दरेकर म्हणाले, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री, बिहार आणि मुंबई पोलिस असा वाद उभा करुन मूळ विषयाला बगल देण्याचा प्रकार चालू आहे. पंचनाम्याशिवाय मदत नाही, म्हणता. पण १० टक्केही पंचनामे अद्याप झालेले नाहीत. मग आपण कधी आणि कशी मदत करणार आहात. मुख्यमंत्रीच एकेकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि ५० हजार मदतीचे आश्वासन देत होते. आता तुम्हाला कोण थांबवलं आहे.`` 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल शेतकऱ्यांना तीन हजार ८०० रुपयांची मदत दिली. अशा पद्धतीने शेतकऱ्यांची अशी चेष्टा करू नका, शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com