agriculture news in marathi Government should stop the business of taking decision against soyabean farmers say Ravikant Tupkar | Page 4 ||| Agrowon

सरकारने कोंबड्या जगविण्यासाठी शेतकरी मारायचा धंदा बंद करावा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021

सोयापेंड आयातीमुळे सोयाबीनचे भाव कोसळले असून, केंद्र सरकारने कोंबड्या जगविण्याचा अन् शेतकरी मारायचा धंदा बंद करावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली.

यवतमाळ : केंद्र सरकारने कोंबड्यांना खाद्य पुरविण्याच्या नावाखाली सोयापेंडची आयात केली. यामुळे सोयाबीनचे भाव कोसळले असून, केंद्र सरकारने कोंबड्या जगविण्याचा अन् शेतकरी मारायचा धंदा बंद करावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. न्याय मागण्यांसाठी सोयाबीन, कापूस उत्पादक शेतक-यांचे आंदोलन पेटविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

रविवारी (ता. ७) यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तुपकर बोलत होते. श्री. तुपकर यांनी नुकताच बुलडाणा येथे मोर्चा काढून या कार्यास प्रारंभ केला. आता यवतमाळ, अमरावती, अकोला, अकोट, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी बैठक घेऊन मोर्चे बांधणी करण्यात येणार आहे. वाशीम येथे या मोहिमेचा समारोप होणार असून, याच दिवशी १२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा घोषित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मुलांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठीमागे राहून झिंदाबाद, मुर्दाबादच्या घोषणा देण्यापेक्षा आपल्या शेतकरी बापाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. 

विदर्भ तसेच मराठवाड्यातील सोयाबीन, तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कुणीही वाली राहिलेला नाही. ज्या पद्धतीने ऊस उत्पादक शेतकरी तसेच त्या भागातील लोकप्रतिनिधी आपली बाजू मांडून न्याय पदरात पाडून घेतात त्याच पद्धतीने आता सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्यासाठी लढा उभारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

सध्या सोयाबीनला एकरी २५ हजार रुपये खर्च येत आहे. दुसरीकडे सरासरी एकरी चार ते पाच क्विंटल चे उत्पन्न होत असल्याने पाच ते दहा हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे एकरी नुकसान झाले आहे. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी तसेच सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. सोयाबीन उत्पादक शेतकरी सतत नुकसान सहन करीत असल्याने सरकार विरोधात आता जनआंदोलन पेटविणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव, संतोष अरसड, विष्णू लांडगे उपस्थित होते. 

अन्यथा वीज कार्यालय पेटवू 
अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कैचीत पकडून त्यांच्या शेतातील मोटरची वीज कापण्याचा धंदा वीज वितरण कंपनीने सुरू केला आहे. मोठमोठ्या कंपन्यांकडील वीजबिल वसुली न करता शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यालय पेटविल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, असा इशारा श्री. तुपकर यांनी या वेळी दिला. 
 


इतर ताज्या घडामोडी
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे...घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात...
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...