शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : कृषिमंत्री भुसे

नाशिक : ‘‘शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,’’ असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिला.
The government stands firmly behind the farmers: Bhuse
The government stands firmly behind the farmers: Bhuse

नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचले. तर, काही शेतातील मातीसुद्धा वाहून गेली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच त्यांना शासनामार्फत मदत दिली जाईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,’’ असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिला. 

लखमापूर (ता. सटाणा) येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन सोहळा झाला. आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषदेचे सदस्य यतीन पगार, माजी सदस्य प्रशांत बच्छाव, मधुकर देवरे, म.वि.प्र.चे उपसभापती राघो अहिरे, डॉ. शेषराव पाटील, गजेंद्र पाटील, शशी निकम, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार उपस्थित होते.

भुसे म्हणाले, ‘‘नुकसानग्रस्त शेतशिवाराचे पंचनामे कृषी विभागामार्फत करण्यात येत आहेत. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यांनी संबंधित विमा कंपनीकडे रीतसर अर्ज दाखल करावा. शेतकऱ्यांना सक्षम व समृध्द करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कर्जमुक्तीच्या घोषणेची अंमलबजावणी करून १९.५० हजार कोटीचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.’’      

कृषी संदर्भातील सूचना, संकल्पना स्वागतार्ह शेतमालाची साठवणूक, प्रक्रिया व उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यासाठी स्मार्ट योजना कृषी विभागाकडून प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी गटशेतीसह शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे आवाहन भुसे यांनी केले. कृषी संदर्भातील चांगल्या सूचना व संकल्पना स्वागतार्ह आहेत. स्थानिक पातळीवर कृषी विभागाकडे त्यांचे संकलन करण्यात येईल, असेही ते म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com