अर्थव्यवस्था डबघाईला येण्यामागे सरकारी धोरणे ः बाळासाहेब थोरात

अर्थव्यवस्था डबघाईला येण्यामागे सरकारी धोरणे ः बाळासाहेब थोरात
अर्थव्यवस्था डबघाईला येण्यामागे सरकारी धोरणे ः बाळासाहेब थोरात

अमरावती ः ‘‘भाजप सरकारचा ५ वर्षांचा कालखंड पूर्ण होत आहे. मात्र, या सरकारकडे अपयशी सरकार म्हणून बघितले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याला फक्त भाजप सरकारची धोरणे जबाबदार आहेत,’’ असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. महापर्दाफाश यात्रेनिमित्त ते सोमवारी (ता. २६) अमरावतीमध्ये बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘भाजप सरकारने शेतकरी, कामगार, व्यापारी, बेरोजगार यापैकी कुणाचेच प्रश्न सोडवले नाहीत. यांचे नेते जोरजोरात भाषण करतात. मात्र, त्यामध्ये पूर्णतः खोटी माहिती देतात. यांच्या बनवाबनवीच्या कार्यक्रमाची पोलखोल करण्यासाठी महापर्दाफाश यात्रा काढली आहे. अनेक उद्योग सरकारच्या धोरणांमुळे आपले काही उपक्रम, उत्पादने बंद करीत आहेत. सरकार रोजगार देण्यास असमर्थ असतानाच खासगी क्षेत्रातूनही नोकऱ्या मिळत नाहीत, अशी भयावह परिस्थिती राज्यात, देशात पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. सरकार या परिस्थितीवर मात करण्यात अपयशी ठरले. राज्यात स्थिती यापेक्षा वेगळी नाही. काही केलेच नसल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जनादेश यात्रा काढण्याची वेळ आली. पुढे त्यांच्यावरही आत्मचिंतनाची वेळ येईल,’’ असे ते म्हणाले. 

आघाडीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात येणार आहे. धर्मनिरपेक्ष शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच वंचित आघाडीसोबत चर्चा केली जात आहे. मात्र, सोबत यायचे की नाही हा त्यांचा निर्णय आहे, असे थोरात म्हणाले. तसेच देश ज्या वळणावर उभा आहे त्या वळणावर सर्वांनी ताकदीने लढण्याची गरज असल्याचे थोरात म्हणाले. तेलाई मंगल कार्यालयात झालेल्या या सभेला माजी खासदार नाना पटोले, माणिकराव ठाकरे, आशिष देशमुख, वजाहत मिर्झा, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com