पूर संकटाचा नव्याने अभ्यास

शासन या मुद्यांचा शोध घेत आहे धरणांमधील सुधारित जलाशय परिचालन यंत्रणा कशी असावी? नदीत सोडले जाणारे पाणी एकाच व्यवस्थेत कसे मोजावे? पूरप्रवण क्षेत्रात बांधकाम आहेत काय व त्याचे नियंत्रण कसे करावे? आपत्कालीन कृती आराखडा कसा असावा?
पूर संकटाचा नव्याने अभ्यास
पूर संकटाचा नव्याने अभ्यास

पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या भयावह महापुराची कारणे व उपाय शोधण्यासाठी शासन खडबडून जागे झाले आहे. त्यासाठी ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत.   जलतज्ज्ञ नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. श्री. वडनेरे यांनी प्राथमिक माहिती घेण्यास प्रारंभ केला आहे. केंद्रीय जल आयोगाचे मुख्य अभियंता नित्यानंद रॉय यांचा समावेश असलेल्या या समितीत जलसंपदा विभागाचे लाभक्षेत्र विकास सचिव राजेंद्र पवार यांनी सदस्य सचिव म्हणून कामकाज सुरू केले आहे.  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्य विनय कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे प्रकल्प समन्वय सचिव संजय घाणेकर, आयआयटीचे प्राध्यापक रवी सिन्हा, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोगिता (एमआरसॅक) केंद्राचे संचालक, आयएमडीचे उपमहासंचालक, आयआयटी पुण्याचे संचालक आदी उच्चपदस्थांनाही समितीत घेण्यात आले आहे. पूर परिस्थितीला बांधकामे कितपत जबाबदार आहे याचाही शोध घेतला जाणार आहे. यंदाचे पूर कशामुळे आले, अलमट्टी व इतर धरणांमुळे महाराष्ट्रात पूर परिस्थिती तयार होते का, भविष्यातील पूर संकट टाळण्यासाठी उपाय काय असावेत, या प्रश्नांची उत्तरे अभ्यास अहवालात देण्याची सूचना करण्यात आली आहे.  कृष्णा व भीमा खोऱ्यातील यंदा उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या अभ्यासासाठी उपगृह प्रणालीचा वापर करण्यास मंजुरी मिळाली आहे. पुराला नैसर्गिक स्थिती जबाबदार आहे का तसेच अलमट्टीचा प्रभाव कितपत पडतो याचाही सखोल अभ्यास होईल. अर्थात, पूर नियंत्रणासाठी तत्काळ करायचे उपाय व भक्कम स्वरूपाच्या दीर्घकालीन उपायांभोवती आमचा अभ्यास केंद्रीत असेल.  - जलतज्ज्ञ नंदकुमार वडनेरे,  अध्यक्ष, कृष्णा-भीमा खोरे पूर स्थितीविषयक कारणे व उपाय अभ्यास समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com